पाथर्डी – येथील निवासी
मतिमंद विद्यालय व निवासी मतिमंद मुलांचे बालगृह मोहरी रोड येथे राष्ट्रीय युवा
दिन स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त श्री शंकर
महाराज मठाचे मठाधिपती माधवबाबा यांच्या शुभहस्ते ११० रग ( ब्लॅकेट ) तसेच
विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी माधवबाबा
यांनी मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्य हे ईश्वरी कार्य असून सामाजिक कार्यातून
मनशांती व आनंद मिळतो म्हणून गरजवंत मुलांना मदतीचा हात देऊन,ह्रदयातील आनंद अनुभवला पाहिजे,समाजाने ही गरजूंना योग्य मदत करुन हा
आनंद मिळवावा असे सांगितले.गेल्या दहा वर्षा पासून शंकर महाराज मठाचे मठाधिपती प.पू.माधवबाबा हे
या सेवेचा अखंड आनंद घेत आहेत. यावेळी महंत माधवबाबा यांचे भक्त धरमचंद गुगळे,बाळूशेठ लाहोटी, शिवव्याख्याते सचिन
नागापुरे, बजरंग सुडके, अशोक जेधे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments