मुकबधीर विद्यालयात मकारसंक्रातीच्या औचीत्यावर अनोखा सामाजिक उपक्रम

 

पाथर्डी – येथील निवासी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थीनीना मकर संक्रांत सणाच्या औचीत्यावर समाजिक उपक्रमातून आधुनिक शुंगार तसेच मिठाईचे वितरण न्यू तिरुपती बालाजी बँक व अभ्यासिकेच्या संचालिका ज्योती शर्मा व क्रिस्टल ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ शीला बडे यांच्या सहयोगातून करण्यात आले.

मकर संक्रांत म्हणजे सूर्याचे मकर राशीमध्ये प्रवेश या सणांमध्ये महिला वर्गा च्या आनंदाला उधान येत असते पण हा आनंद सगळ्यांनाच मिळतो का ? का काहीजण यापासून उपेक्षित राहतात ? हा विचार ज्योती शर्मा आणि शीला बडे यांच्या मनात आला त्यांना असे वाटू लागले की कर्णबधिर विद्यार्थिनींसाठी आपण काय करू शकू का, त्यांना तर बोलता येत नाही ऐकू येत नाही पण खरे तर असे असते की बंधन पलीकडेही एक नाते असते. शब्दाचे बंधन त्याला नसते. भावनांचा आधार असतो, दुःखाला तिथे थारा नसतो. खरोखरच यामध्ये शब्दांची देवाण नसले तरी कृतीतून आपण काय देऊ शकतो तर ते म्हणजे या सणाला इतरांप्रमाणे नटण्याची या विद्यार्थिनींचे हौस ही हौस पूर्ण करण्यासाठी अनोखा सामाजिक उपक्रम राबवत क्रिस्टल ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ शीला बडे आणि न्यू तिरुपती बालाजी बँक आणि अभ्यासिकेच्या संचालिका ज्योती शर्मा यांनी मुकबधीर,अनाथ मुलींची हौस पूर्ण केली आहे.निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी मेहंदी रेखाटन,केशरचना व मेकअप याचे आयोजना यावेळी करण्यात आले होते तसेच याप्रसंगी मिठाईचे वाटप करण्यात आले.या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थिनींना आपण परी असल्यासारखे वाटू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आयोजकांचे मन तृप्त झाले. याप्रसंगी निवासी मूकबधिर विद्यालयाचे संचालक डाळिंबकर सर मुख्याध्यापक भोसले सर विद्यालयाच्या सर्व स्टाफ यांचे खूप सहकार्य लाभले.

 


Post a Comment

0 Comments