शहरातील बाबूजी आव्हाड,एम.एम.निऱ्हाळी,वसंत दादा शाळा आदी महाविद्यालय
व खाजगी क्लासेसच्या वेळी तसेच सायंकाळच्या वेळी मुख्य बाजारपेठ व उपनगरामध्ये नेहमीच
टारगट दुचाकी स्वार विद्यार्थीनी व महिलांच्या छेडछाड करतात त्यामुळे शहरात नेहमीच
छोटेमोठे वाद ही नित्याची बाब झाली आहे.तालुक्यातील अनेक विद्यार्थिनी शिक्षणासाठी
बसने प्रवास करतात बस स्थानकावरही विद्यार्थिनीच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहे. काही
टारगट रोड रोमियो सायंकाळी शहरातून जोरात गाडी चालवुन कर्णकर्कश होर्न वाजवून
समोरच्या गाडी चालकाला हुल देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे छोटेमोठे अपघात घडत
आहेत.यामुळे काही मुलींनी आपले शिक्षण बंद केले असून काही मूली शिक्षण बंद होईल या
भीतीने होणाऱ्या छेडछाडिचे प्रकार पालकांना सांगता नाहीत.एखादी मोठी गंभीर घटना
घडण्या पूर्वीच पोलिसांनी गंभीरपणे याबाबत कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत
होती.
अल्पवयीन दुचाकी स्वार यांच्या गाड्या जप्त करून त्यांच्या पालकांवर
कडक कावाईचे धोरण अवलंबण्यात आले.याशिवाय विना
नंबरचे बुलेट व कर्णकर्कश आवाज दुचाई स्वार यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.सकाळी
व सायंकाळी शहरातील मुख्य चौकातून रस्त्यावर पर्किक केल्याने वाहतूक कोंडी
रोखण्यासाठी अश्या बेशिस्त वाहनावर दंडाची कारवाई केली जात आहे.याशिवाय रस्त्यात
हातगाडे,चौंकातील मोठमोठाले फलक व इतर होणारे अडथळे देखील हटविण्यास प्रारंभ करण्यात
आला आहे.पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना दुचाकी देवू नये असे आवाहन पोलिसांनी
केले आहे.या मोहिमेत पोलीस निरीक्षक सुहास
चव्हाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे,प्रवीण पाटील, कौशल्यरामनिरंजन वाघ,
पोलीस उपनीरीक्षक सचिन लिमकर आदी पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
0 Comments