पाथर्डी – तालुक्यातील मिरी परिसरात त्रिदल सैनिक संघटने तर्फे भारतीय
सैन्यदलातील आजी माजी सैनिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सैनिक संपर्क
अभियानातील सहाव्या फेरीत मिरी येथील राजा
वीरभद्र देवस्थान याठिकाणी दर्शन घेवून परिसरातील आजी माजी सैनिकांच्या अडचणी जाणून घेत
उपाययोजना करण्या संदर्भात विचार विनिमय करण्यात आला.
त्रिदल सैनिक संघटने तर्फे सैनिक संपर्क अभियानांतर्गत सहाव्या चरणातील मिरी परिसरातील सैनिकांच्या उपस्थित येथील देवस्थान श्री राजा वीरभद्र (बीरोबा ) जागृत देवस्थान याठिकाणी नारळ फोडून आशिर्वाद घेत सैनिकांशी विचारविनिमय करून अडचणी समजून घेतल्या.यावेळी त्रिदल सैनिक सेवा संघ तालुका अध्यक्ष गोवर्धन गर्जे यांनी सैनिकांना संबोधित करताना, या अभियाना अंतर्गत तालुक्यातील ७० टक्के गावातील सैनिकांच्या भेटी घेऊन अडचणी समजून घेतल्या जात असून सर्व ताकदीने शासन प्रशासनाकडे सैनिकांच्या या अडचणी व प्रश्न मांडून सोडवून घेण्यासाठी सर्व ताकदीने एकत्रित लढा उभा करायचा आहे वेळ पडल्यास लोकप्रतिनिधीकडे याबाबत प्रश्न उपस्थित करायचे,आणि त्यातूनही मार्ग निघाला नाही तर, आपसातील राजकिय पक्षाबद्दल असलेली भावना व प्रेरणा बाजूला ठेवून निवडणुकांपूर्वी सर्व सेवारत व माजी सैनिकांनी एकत्र बसून योग्य निर्णय घ्यायचा,जे लोकप्रतिनिधी सैनिकांच्या अडचणी व प्रश्न समजून घेऊन त्याचे निवारण व सहकार्य करतील त्यांनाच सैनिक सामूहिक निर्णय घेऊन पाठिंबा जाहीर करणार असे गर्जे यांनी बोलतांना सांगितले.यावेळी त्रिदल सैनिक संघ मिरी गट प्रमुख भीमराज पाटेकर यांनी बोलतांना संघटनेच्या आगामी घेय धोरणावर सहमती दर्शवत मिरी तिसगाव गट परिसरातील सर्व सैनिकांना संघटनेशी एकनिष्ठ करून जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहतील असे सांगितले.
यानंतर शीराळ येथे अशोक गोरे त्रिदल अहमदनगर
ग्रामीण अध्यक्ष यांनी कोल्हारचे माजी सैनिक नवनियुक्त उपसरपंच गोरक्ष
पालवे यांचा सत्कार केला.या अभियानात गोवर्धन विक्रम गर्जे,कॅप्टन
विठ्ठल तांदळे, कॅप्टन
मधुकर पाखरे, लेफ्टनंट
शिवनाथ ढोले, मधुकर
चन्ने,प्रभाकर फुंदे,
रामकिसन कुटे,
म्हातारदेव आव्हाड,
सुधाकर आव्हाड,
रामराव चेमटे,मिरी
येथील भीमराज पाटेकर,
अशोक गोरे,
सादिक शेख,
रघुनाथ वाघ,
ज्ञानदेव शिकारे,
सतीश धरम,
गोरख कुल्हारि,
गायकवाड,
चांगदेव आठरे,
गोरख पालवे,
बाळासाहेब भुकान,
संतोष शिदोरे आदी सैनिक
बांधव उपस्थित होते.
0 Comments