करंजी - चाकणवरुन गॅसच्या टाक्या घेवुन नांदेडला जाणारा ट्रक
कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या अवघड वळणावर पलटी
झाला. सुदैवाने या अपघातात वाहन चालक बचावला.
चाकण येथुन इंडियन
ऑईलचा गॅसच्या टाक्या घेवुन नांदेडकडे जाणाऱ्या एम.एच.२६ एडी-२४७४ ट्रक
कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील अवघड असणाऱ्या करंजी घाटातील
माणिकपिर बाबाच्या वळणावर अंदाज न आल्याने पलटी झाला. काल रात्री आठ वाजण्याच्या
दरम्यान घडलेल्या या अपघातात ट्रक चालक अमोल शहादेव पालवे व त्याचा साथीदार पप्पु
मारुती पालवे सुदैवाने बचावले. घाटाच्या कठड्यामुळे हा ट्रक खोल दरीत गेला
नाही.करंजी घाटाच्या पायथ्याशीच महामार्ग पोलिसांची चौकी आहे. अपघातास बारा तास
उलटून गेले तरी अद्याप महामार्ग पोलिसांची या अपघातग्रस्तांना कोणतीच मदत मिळु
शकली नाही. ट्रक पलटी झाल्यानंतर ट्रकमधील गॅसच्या टाक्या रस्त्यावर पडल्याने काही
वेळ वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. परंतु येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालक व
प्रवाशांच्या मदतीने या रस्त्यावरील गॅसच्या टाक्या बाजुला करण्यात आल्याने
वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला. महामार्ग पोलिस चौकीतुन दिसणार्या या
अपघातग्रस्तांना महामार्ग पोलिसांची कोणतीच मदत मिळु शकली नसल्याबद्दल नागरिकात
मात्र चिंता व्यक्त केली जात होती.
0 Comments