मिरी - पुणे
महानगरपालिकेच्या वतीने
कनिष्ठ अभियंता
या वर्ग दोन पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील
कु. पुजा भाऊसाहेब नन्नवरे हीची निवड झाली आहे.
पुजा हिने अतिशय खडतर प्रवास करून स्वकर्तृत्वावर हे यश मिळवले असून तीच्या या
यशाबद्दल मिरी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत
आहे. कु. पुजा हिला यासाठी आई-वडिलांसह अनेक शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
आहे.पुजा ही मिरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब नन्नवरे यांची कन्या, तसेच पुणे येथील लघु उद्योजक शैलेश नन्नवरे व मिरी सेवा संस्थेचे माजी व्हा.चेअरमन
ज्ञानदेव नन्नवरे यांच्या भगिनी आहेत. बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता या शासकीय
पदावर निवड झाल्याने आईवडीलांचे स्वप्न पूर्ण करता आले याचा मनापासून आनंद असून या
पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचा विचार करूनच लोकहिताचे काम
करणार असल्याचे पुजा हिने बोलताना सांगितले.
0 Comments