बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंचे महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेत नेत्रदिपक यश

पाथर्डी - बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्स, वेटलिफ्टिंग स्पर्धेत बाबुजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी येथील खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी करत दोन सुवर्ण, एक रौप्य, व एक कास्य पदक पटकावले. 
यामध्ये कु. कोमल वाकळे हिने ८७ किलो वजन गटात २०७ किलो वजन उचलून सुवर्णपदक, कु. योगिता खेडकर हिने ८७ किलो वरील वजन गटात १८८ किलो वजन उचलून सुवर्णपदक तर संजय लोखंडे याने ६१ किलो वजन गटात २३९ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. तसेच कुस्ती स्पर्धेमध्ये पै.अनिल लोणारे याने ९२ किलो वजन गटात कास्यपदक मिळविले. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी अभिनंदन केले. त्यांना जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख व प्रा. सचिन शिरसाट यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल जिल्ह्यातून खेळाडूंवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

 

Post a Comment

0 Comments