पाथर्डी - तालुक्यातील
एकनाथवाडी येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्याने मंगळवारी पहाटे १३ बकऱ्या
चोरून नेहल्याची घटना घडली असून याबाबत शेतकऱ्याच्या फिर्यादी नुसार अज्ञात
चोरट्यान विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
एकनाथवाडी येथील शेतकरी सिताराम आश्रुबा तांदळे हे कुटुंबासह गावच्या शिवारात रहात असून शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात शेतीला जोडधंदा म्हणुन शेळी पालन करतात त्यांच्या घरापासुन जवळच शेतात शेड बनवलेले असुन त्यामध्ये १३ शेळ्या बांधलेल्या होत्या.
दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी आश्रुबा त्रिंबक तांदळे यांनी
दिवसभर शेळ्या डोंगरावर चारुन
सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एकनाथवाडी येथील फिर्यादी यांचे शेड मध्ये शेळ्या
बांधल्या मात्र दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७ वाजता फिर्यादीचे वडील झाडलोट करण्यासाठी गेले असता शेडचे
तारेचे कंपाऊड ला लावलेले दरवाजाचे कडी कोयंडा तोडलेला दिसला व शेड मध्ये शेळ्या दिसुन आल्या नाहीत.आजुबाजुला
शोध घेतला परंतु शेळ्या मिळुन आल्या नाहीत त्यामुळे शेळ्या कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे संमती शिवाय लबाडीच्या ईरादयाने १३ शेळ्या त्याची किमंत ७३,०००/- हजार रुपये अज्ञात चोरटयाने चोरुन नेह्ल्या बाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
0 Comments