करंजी - श्री संत भगवान बाबानी आपले संपुर्ण
आयुष्य समाजसेवा करण्यात व समाजातील पिडीत लोकांची सेवा करण्यात व्यतीत केले असे मत ह.भ.प.कारखेले महाराज यांनी चिचोंडीतील संत भगवान
बाबांच्या सप्ताहानिमित्त आयोजित तिसऱ्या दिवसाची किर्तनरुपी सेवा करताना व्यक्त
केले.
श्री संत भगवान बाबांनी आपले संपुर्ण आयुष्य समाजाच्या उध्दारासाठी व समाजातील
पिडीत लोकांची सेवा करण्यात खर्ची
घातले. भगवान बाबांनी आपल्या जिवनात काय काम केले याचा विचार करुन आजच्या तरुणांनी
त्याचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मतही आपल्या किर्तनातुन त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ५१ पुष्प हार महाराजांना घालण्यात आले.या
सप्ताहाचे नियोजन बालब्रम्हचारी लक्ष्मण महाराज कराड यांच्या मार्गदर्शनाखाली चालु
आहे. यावेळी चेअरमन पोपटराव आव्हाड, भानुदास आव्हाड, माजी सरपंच विष्णु गंडाळ,रमेश जऱ्हाड, वैभव मेजर,कैलास आव्हाड, सुनिल गरुड, नितीन गरुड, आसाराम आव्हाड, बबलु आव्हाड, रोहीदास आव्हाड, संजय आव्हाड, बंडु आव्हाड, आदिनाथ पालवे, तुळशीदास पालवे,विठ्ठल पालवे, कमलेश शेठ गुगळे,शिवाजीराव दानवे, अंबादास डमाळे, शुभम गरुड, मल्हारी गरुड, ह.भ.प.जय आनंद आव्हाड, आदिनाथ मोरेसह परिसरातील अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने
पुरुष,तरुण व महिला भाविक हजर होते. यावेळी
अन्नदानाचे पवित्र कार्य चेअरमन संतोष गरुड यांनी पार पाडले. या प्रसादाचा लाभ
मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला.
0 Comments