पाथर्डी - वनदेव डोंगराला आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणाने आग लागून मोठ्या प्रमाणावर वन हद्दीतील जैवविविधता पशुपक्षी यासह वनस्पती व झाडे भस्मसात झाली असून निसर्ग प्रेमी नागरीकातून या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाथर्डी शहराच्या जवळच असलेला वनदेव डोंगर निसर्गरम्य असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते याच सोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मद्यपी व उपद्रव मूल्य असलेले नागरिक देखील गैर कृत्य करण्यासाठी एकांत शोधत असतात याबाबत सामाजिक क्षेत्रातून वेळोवेळी आवाज उठवण्यात आला होता परंतु वनविभाग व पोलीस प्रशासनाकडून या उपद्रव्य मूल्यांवर वेळीच कारवाई न झाल्यामुळे त्यांची मनोधैर्य वाढवून या ठिकाणी गैरकृत्य सुरूच आहेत आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वनदेव डोंगरातील महादेव मंदिरा जवळील डोंगराला आग लागून मोठ्या प्रमाणावर वन हद्दीतील असलेली जैवविविधता जसे की पशुपक्षी यांची घरटे निसर्गास उपयुक्त असणारे कीटक विविध वनस्पती व झाडे आगीत नष्ट झाली आग लागून बराच वेळ उलटला तरी देखील वनविभाग अथवा स्थानिक पालिका प्रशासन या घटनेकडे फिरकले नाही, वन हद्दीतील वनस्पती तसेच वृक्ष यांचे नुकसान झाल्याने वृक्षप्रेमी नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे, या घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभाग व पोलीस प्रशासन अशा स्वरूपाच्या आगी लावणाऱ्या उपद्रव मूल्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
0 Comments