ग्रामपंचायत तो झाकी है पिक्चर अभी बाकी है -किसन चव्हाण


पाथर्डी - ज्या कार्यकर्त्याला साधे बुथ प्रमुख देखील करीत नव्हते,अशांना आम्ही उमेदवारी देऊन जनतेचा प्रतिनिधी बनण्याची संधी दिली.यामुळे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी धनशक्तीला बाजूला करत सर्वसामान्य वंचित कार्यकर्त्यांच्या हाती सत्ता देण्याचे काम केले आहे.याचीच पुनरावृत्ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करून तालुक्यातील साखर कारखानदारांची मक्तेदारी मोडीत काढू असा गर्भित इशारा देत ग्रामपंचायत तो झाकी है पिक्चर असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते किसन चव्हाण यांनी केले.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान आघाडीच्या वतीने करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून चव्हाण बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून,उद्योजक डॉ.बंडूशेठ भांडकर,जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के,शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलालभाई शेख,महेश पवार,चाँद शेख,नितीन मगर,महीला तालुकाध्यक्ष सुनिता जाधव,उपाध्यक्ष रोहीणी ठोंबे,तोंडोळीचे सरपंच अरुण जाधव,अशोक गोरे,विनायकराव देशमुख,महेंद्र राजगुरू,पप्पू बोर्डे, आदी उपस्थित होते.पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की,वर्षानुवर्ष प्रस्थापितांच्या राजपुत्रांनाच विविध ठिकाणी संधी दिली जाते.सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र सतराच्या उचलण्याचे काम करत होते.अशा जनमानसातील कार्यकर्त्यांना आता वंचित बहुजन आघाडी संधी देत आहे.विशेष म्हणजे वंचित आघाडी व शिवसेना पक्षाची युती होत आहे.यामुळे मोठे बळ प्राप्त होणार असुन याचा देखील फायदा कार्यकर्त्यांना होणार असल्याने वंचित व शिवसेना ही युती ग्रामपंचायत ते लोकसभा अशा सर्व निवडणुका लढणार असल्याचे जाहीर केले.मागील काळात पैसाच हा निवडणुकीत सर्वस्व होता.ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीत लोकांनी करोडपती,अब्जाधीश यांना धूळ चारत सामान्य उमेदवारांना सभागृहात पाठवल. कोरडगाव पॅटर्न राबवणार म्हस्के विशेष म्हणजे कोरडगावात तीन हजार मतापैकी अवघी ३५ मते असणाऱ्या वडारी समाजाच्या उमेदवाराला सहाशे पेक्षा अधिक मतांनी विजयी करत आर्थिक सह जातीय समीकरण मोडीत काढणा-या या पॅटर्नची आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकात पुनरावृत्ती करू असे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments