आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शिवसेनेचाच - आमदार सुनिल शिंदे

 

पाथर्डी - आज पाथर्डी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दहा शाखेचे उद्घाटन झाले. तालुका शिवसेनामय झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय जनतेला सहन झालेला नाही. म्हणुन त्यांच्याबद्दल शहरासह ग्रामीण भागतील जनतेत प्रचंड सहानुभुती निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पाथर्डीचा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य व नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनिल शिंदे यांनी केले.

तालुक्यातील कारेगाव,मोहटे,चिंचपुर इजदे,करोडी, तिनखडी, भिलवडे, पिंपळगाव तप्प्पा ,चिचपुर पांगुळ, वडगाव, जोगेवाडी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. जोगेवाडी येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, पाथर्डी तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी काटे, रावजी नांगरे, पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या विधानसभा संघटक पुष्पा गर्जे,अशोक गायकवाड, राजेंद्र म्हस्के, उपतालुका प्रमुख अमोल जायभाये, भाउसाहेब धस,महादेव रहाटे, शायद पठाण ,दत्ता दराडे, शिवाजी कंठाळे, मिरा बडे, सविता पवार, संजय गोल्हार, अंकुश आव्हाड,आदर्श काकडे यांच्यासह सर्व शाखाप्रमुख उपशाखा प्रमुख शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.ठिकठिकाणी आ.शिंदे व पदाधिकाऱ्यांचे ढोल ताशाच्या वाद्यात फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना आ.शिंदे म्हणाले की मातोश्री आमच्यासाठी मंदिर असुन शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी दैवत आहेत.स्वार्थी मंडळी उद्धव ठाकरे यांना सोडून निघुन गेली.अनेक वर्षापासुन शिवसेनेची ग्रामीण भागातील जनतेशी नाळ घट्ट जोडली गेली आहे त्यामुळे पोषक वातावरण आहे. पुढील काळ फक्त शिवसेनेचाच आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचाच वरचष्मा राहिल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.शिवसेनेच्या बाबतीत कोर्टाचा निर्णय काहीही होऊ द्या त्यांचे दिवस मात्र थोडेच राहिले आहेत.राज्य सरकार काम कमी अन् घोषणा व प्रसिद्धीच जास्त करत आहे.शेतकरी प्रोत्साहन अनुदान योजनेत नगर जिल्हयातीयावेळी राजेंद्र दळवी, राजेंद्र म्हस्के यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख भगवानराव दराडे,सुत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी तर आभार माजी शहरप्रमुख भाऊसाहेब धस यांनी मानले.


Post a Comment

0 Comments