थाटमाटासाठी पदे हवे असली तरी मतदार तुमची मस्ती जिरवतील – प्रताप ढाकणे

 

पाथर्डी -तुम्हाला काँग्रेसने सर्व काही दिले,त्याच पक्षामुळे तुमचे सर्व काही वैभव वाढले,तुमची अशी भूमिका लोकांना अजिबात आवडलेली नाही,पोटभर जेवलेल्यांना उपाशी माणसाची किंमत कळत नाही,मोठेपणा व थाटमाटासाठी पदे हवे असली तरी लोक तुमची मस्ती जिरवतील अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी सत्यजित तांबे यांचे नाव न घेता केली.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीपुढे ते बोलत होते उमेदवार शुभांगी पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे 'शिवसेनेचे भगवान दराडे' माजी नगरसेवक बंडू बोरुडे,हुमायून आतार,माजी नगराध्यक्ष रत्नमाला उदमले,महिला आघाडीच्या सविता भाकर व अनिता निराळी काँग्रेसचे आनंद सानप,सीताराम बोरूडे आदींसह शहरातील मतदार उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब खेडकर,अजय पाठक यांनी भाषणे केली. शिक्षक सोसायटीचे नेते सुरेश मिसाळ यांनी संघटनेच्या वतीने स्वागत केले.

यावेळी बोलताना ढाकणे म्हणाले पक्षाने उमेदवारी देऊन संबंधितांना दोन कोरे फॉर्म पाठवले त्यांच्या कुटुंबात काय घडले आता काही कळाल नसले तरी पाठिंब्याबाबत राष्ट्रीय पक्षाकडून अवलंबण्यात आलेली नीती बरेच काही स्पष्ट करणारी ठरवून योग्य वेळी सर्व काही परिस्थिती आपोआप बाहेर येईल पदाचे कर्तव्य,प्रश्नाची जाण व परिस्थिती कळणाऱ्यां शुभांगी पाटील यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे त्यांनी आवाहन केले यावेळी पाटील यांनी भाषण करत येत्या दोन तारखेनंतर सर्वकाही बोलणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर राजळे सूत्रसंचालन गणेश सरोदे तर आभार सविता भापकर यांनी मानले.

पाथर्डी शेवगाव मतदार संघात पंचायत समिती गण निहाय राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे येत्या सहा तारखेपासून सुरू होऊन मार्च महिन्यात पक्षाचा महामेळावा वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पाथर्डीत होईल अशी माहिती ढाकणे यांनी दिली या निर्णयाचे पक्षांतर्गत पडसाद मतदारसंघात कसे उमटतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments