राजकिय वारसा सिध्द करावा लागतो – डॉ.उषाताई तनपुरे

करंजी -संगीत खुर्ची, लिंबु चमचा खेळ खेळत महिलांनी उखाणे घेवुन निंबोडी येथील हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात अनेक बक्षीसे मिळविली. निबोंडी येथे रंगतदार झालेला हळदी-कुकंवाचा हा कार्यक्रम सखी ग्रुप,ब्युटीफुल ग्रुप,दत्त भजनीमंडळाने आयोजित केला होता.या कार्यक्रमास परिसरातील महिला बचत गटातील व सर्वच पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. 

पाथर्डी तालुक्यातील निंबोडी येथे झालेल्या या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात डाॅ. उषाताई तनपुरे म्हणाल्या, आम्हाला राजकिय वारसा मिळाला असला तरी तो सिध्द करावा लागतो, आज महिलांमध्ये संघटन महत्वाचे आहे, एकीचे बळास अनन्य साधारण महत्व आहे. आपण आपल्या मुलांना मोबाईलपासुन दुर ठेवले पाहिजे, मुलावर चांगल्या संस्काराची गरज आहे. प्राजक्त तनपुरेच्या माध्यमातुन आम्ही या भागात अनेक कामे करुन हा भाग सुजलाम सुफलाम करु अशी ग्वाही त्यांनी महिलासमोर बोलताना दिली.

यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या शिवसेनेच्या संघटक व कौडगावच्या सरपंच सौ. मंगलताई म्हस्के यावेळी म्हणाल्या या भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व त्यांच्या संसारवाढीसाठी आपण बचत गटाच्या माध्यमातुन महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करित असुन,यासाठी मि तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाहीही मंगलताई म्हस्के यांनी यावेळी दिली.

यावेळी माजी जि.प. सदस्या योगिता राजळे,तिसगावच्या सरपंच मुनिफा शेख,वारे ताईसह अनेक महिलांची भाषणे झाली. या कार्यक्रमास डाॅ. उषाताई तनपुरे, सौ. मंगलताई म्हस्के,मुनिफा शेख, मंदाताई कुलकर्णी, विद्याताई आठरे,पुष्पाताई गर्ज,मिराबाई बडे,रोहिणी आण्णासाहेब लवांडे, मिराबाई दराडे, राणी पालवे,शुभांगी उदमले,रोहिणी लवांडे, कोरडेताई, जमुनाताई पगारे,पारुताई दोडके,सोनाली दोडकेसह अनेक मान्यवर महिला हजर होत्या. शारदा शेलार व सुमनताई टेमकर यांनी बक्षीस मिळविले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर रांधवणे,तुषार ससाणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भागवत गिता प्रवक्ते भाऊसाहेब शेलार यांनी केले.

 

 

Post a Comment

0 Comments