पाथर्डी - लोकशिक्षणासह
धर्मशिक्षणाची परंपरा विविध संत महंतांनी संत साहित्यातून जोपासली,प्रबोधनासह लोकशाही जिवंत ठेवण्याचा वसा
पत्रकारांकडून जोपासला जात असून पत्रकार सुद्धा लोकशाही मधील संत ठरतात असे मत वारकरी
संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक गोविंद जाटदेवळेकर महाराज यांनी व्यक्त केले .
सन १९९० च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी वर्गमित्र मैत्रिणींचा
वाढदिवस व त्या अंतर्गत पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन अर्जुना लॉन्स येथे आयोजित
केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी
नगराध्यक्ष जनाबाई घोडके ' भारती असलकर ' पत्रकार प्रतिनिधी म्हणून
अविनाश मंत्री '
वकील हरिहर गर्जे उमेश मोरगावकर
'
डॉ.आरती जायभाय व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी संदीप शेवाळे,नारायण पालवे,राजेंद्र देवडे,नितीन गटांनी,अनिल खाटेर,संतोष गांधी,,दादासाहेब येडे,अभिजीत खंडागळे,राजेंद्र भंडारी यासह
विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव पाहुण्यांच्या
हस्ते करण्यात आला.
यावेळी मोहटा देवस्थानचे विश्वस्त डॉ.श्रीधर देशमुख,अजय गरड,सुहास येळाई,ईश्वर जावळे,नंदकुमार सपकाळ आदींचा वाढदिवस
वेदमंत्राचारात सहकुटुंब संपन्न झाला. सी.ए परीक्षेत उज्वल यश मिळवणाऱ्या प्रतीत
देशपांडे व अभिषेक नलांगे यांचा विशेष गौरव संयोजकांतर्फे करण्यात आला. मुख्य
सोहळ्यानंतर महिलांसाठीचा
हळदीकुंकू
समारंभ संपन्न झाला. यावेळी बोलताना गोविंद
महाराज म्हणाले मैत्रीची भावना जपत सकारात्मक संकल्प करत तीस वर्षानंतरही सर्व
मित्रांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.सामाजिक
व वैचारिक भान जपत पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव करण्याने कार्यक्रम अधिक
समाजाभिमुख ठरला आहे.पत्रकारांचे समाज व्यवस्थेतील योगदान विविध रूपात संस्मरणीय
ठरले आहे. संतांनी अभंग, श्लोक 'आध्यात्मिक साहित्याच्या
रचना समाजासाठी करत लेखणी झिजवली.तशीच सेवा पत्रकार समाजासाठी लेखणीच्या
माध्यमातून करीत आहेत. पत्रकारांकडे अथवा विविध माध्यमांकडे बघून आशेचा किरण बघत
सध्याच्या काळात जगण्याची धडपड सर्वसामान्यांची सुरू आहे. माध्यमांनी निर्भीडपणे
उदात्त दृष्टिकोन ठेवून समाज ' राष्ट्रहित ,धर्महित व संस्कृतीचे
रक्षणासाठी लेखन करावे. सर्व प्रकारची माध्यमेच समाजात निर्भीडपणा व समाजभान जागवत
आहेत. यावेळी डॉक्टर ज्ञानेश्वर
दराडे यांनी शीघ्र कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.श्रीधर देशमुख सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील
महाजन व संजय लाड तर आभार अजय गरड यांनी मानले गणेश सोनटक्के यांनी सर्वांचे
स्वागत केले.
0 Comments