पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील किसनराव रंगनाथ
पालवे वय ९१ यांना दिनांक १८/०१/२०२३ सायंकाळी ५.४०
वाजता अल्पशा
आजारामुळे देवाज्ञा झाली.किसनराव पालवे यांनी पाथर्डी तालुक्यात १९८६ साली प्रथमतः शिवसेना पक्षाची
स्थापना केली,किसनराव यांनी एस आर पी मध्ये तसेच साखर कारखाना याशिवाय स्टेनो
म्हणून देखील सेवा केली किसनराव यांनी त्यांच्या हयातीमध्ये एकूण सहा नौकऱ्या
केल्या असून त्यांनी जीवनात स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या नीतीमूल्यांचा प्रचार
आणि प्रसार केला.किसनराव यांच्या चार मुले,नातवंडे,सुना असा मोठा परिवार असून
पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे यांचे ते पिता होत...किसनराव पालवे
यांच्या जाण्याने पाथर्डी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
0 Comments