खेर्डे गावी हरणांची बेसुमार कत्तल ?

 

पाथर्डी - तालुक्यातील खेर्डे येथे गेल्या काही महिन्यांपासून हरणांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करून हरणांचे मांस खाणाऱ्यांच्या तसेच अवैध दारू पिनारांच्या पार्ट्या रंगत असून याबाबत वन विभागाने टाकलेल्या छाप्यात शिकार करण्यात आलेल्या संशयित हरणाचे मास व एका युवकास ताब्यात घेण्यात आले आहे.

पाथर्डी शहराच्या जवळच असलेल्या खेर्डे गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर माळरान जमीन असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हरणांचा वावर आहे. पोलिसांचे व वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने याच परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत असून गेल्या अनेक महिन्यापासून अवैध दारूच्या पार्ट्या सोबत हरण,मोर व इतर जंगली प्राण्यांची शिकार करून त्यांच्या मांसावर दारुडे खुलेआम ताव मारत आहेत. याबाबत अनेकदा स्थानिकांनी वनविभागाला कळूनही काहीच कारवाई झालेली नव्हती, मात्र आज संध्याकाळी गोपनीय खबऱ्यामार्फत वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाच्या पथकाने खेर्डे गावाच्या शिवारामध्ये टाकलेल्या धाडीत दारू पार्टी सोबत संशियीत हरणांचे कापलेले मास शिजत असल्याचे आढळून आले. यावेळी अचानक वनविभागाचे कर्मचारी आल्याचे पाहून दारुड्यांची पळापळ झाली, मात्र मोठ्या शितापीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एका संशयीतास ताब्यात घेतले असून शिजत असलेले मटण जप्त केले आहे. याशिवाय घटना ठिकाणी पुढील पंचनामा सुरू असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


Post a Comment

0 Comments