पाथर्डी – शहरातील कोष्टी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे
हर्षोल्हासात विविध उपक्रम राबवून साजरा
करण्यात आला.
शहरातून काढण्यात आलेली पालखी मिरवणुक लक्षवेधी ठरली, सायंकाळी निवेदक सिध्दार्थ पन्हाळे आयोजित महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला.नवमीच्या दिवशी सकाळी अभिषेक, सत्यनारायण पुजा, कावडी मिरवणुक नंतर रात्री मातेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीमध्ये जोगवा पथक, टाळपथक, अमोल महाराज सोळसे, हभप मतकर महाराजांचे टाळ मृदुंग पथक तसेच हिंदू रक्षा युवा मंचाचे ढोल पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या निमित्ताने दुर्गा सप्तशती पाठ,रक्तदान शिबीर,भजन,कावडी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पैठण हुन आणलेल्या गंगेच्या पाण्याने मातेचा जलाभिषेक करण्यात आला. २२ ते ३१ जानेवारी पर्यंत देवीचा उत्सव समाज बांधवांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोष्टी समाजाचे अध्यक्ष रामदास कांबळे,उपाध्यक्ष संजय गुरसाळी,सचिव किशोर पारखे,नारायण भागवत,अंबादास घटे, राजेंद्र लिपारे, हरिभाऊ वाव्हळ, दत्ता कांबळे, उमेश खटावकर,कृष्णा रेपाळ, अभिजीत भागवत, रविंद्र कांबळे, गोवर्धन देखणे, भारती असलकर,सुनिता उद्बत्ते,वर्षा गुरसाळी,मंगल कुरकुटे,शारदा भैरट,मंजुषा
भंडारी,लक्ष्मी सोळसे,अनिता काळंगे,उज्वला सरोदे,आरती फलके, शितल कांबळे, सारिका इधाटे आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments