पाथर्डी - बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या प्रा.आशा पालवे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद यांचेकडून मराठी विषयात पीएच् डी प्रदान करण्यात आली . त्यांनी मराठी विषयात प्रा .डॉ . अनिल गर्जे यांच्या मार्गदर्शना खाली ' १९९० नंतरच्या निवडक ग्रामीण कादंबऱ्या मधील कृषी जीवनाचे चित्र' या विषयावर संशोधन प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. या संशोधनातून आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याची प्रेरणा तरुण पिढी ला मिळेल . तसेच कृषी संस्कृती स राजकारण कसे बाधक ठरते याचेही विश्लेषण यात आहे .
सदर विषयातील पीएच.डी साठी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अभयराव आव्हाड, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश राव आव्हाड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . जी . पी . ढाकणे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले . बाबुजी आव्हाड महाविद्यालयातील प्रा . डॉ . शेकडे , प्रा . डॉ डोळस , ग्रंथपाल डॉ . किरण गुलदगड व ग्रंथालयांचे सर्व कर्मचारी मोलाचे सहकार्य लाभले .
0 Comments