पाथर्डी - श्री क्षेत्र मायंबा येथे यात्रेनिमीत्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांनी मच्छिद्रनाथांच्या संजीवन समाधी दर्शन घेतले.शनी अमवस्या व मच्छिंद्रनाथांची यात्रा एकाच दिवशी आल्याने येथे नाथभक्ताची अलोट गर्दी झाली होती. मच्छीद्रनाथांचा जय जयकारांने मंदीर परीसर दुमदुमला.नवीन वर्षात मढी मायंबा येथे आजची गर्दी हि उच्चांकी आणि विक्रमी ठरली.
पौष अमवस्या, मच्छिंद्रनाथ यात्रेचा मुख्य दिवस असतो वर्षभरात पौष अमवस्या, गुढीपाडवा समाधी उत्सव , मच्छीद्रनाथ जन्म उत्सव , अमवस्या , पोर्णीमा या दिवसी लाखोच्या संख्येने भावीक मायंबा येथे दर्शनासाठी येतात. शनिवारी पाहटे नाथांच्या माहाआरतीनंतर यात्रेस प्रारंभ झाला.नाशिक, पुणे, औरांगाबाद लोणावळा बीड, आष्टी गंगापूर ठाणे या भागातील भाविकांनी शुक्रवारी रात्रीच
गर्दी केली होती.नगर आष्टी धामनगाव, पाथर्डी व परीसरातील वाडया, वस्ती,तांडे येथील पायी येणाऱ्या भावीकांची संख्या लक्षणीय होती.
देवस्थान समितीतर्फे निवास व्यवस्था, पार्कीग,आरोग्य सुविधा
पिण्याचे पाणी पुरवण्यात आले.
यात्रेत दुकानाची
मंदिर परिसरात सुसज्ज व्यवस्था केल्यामुळे भाविकांना यात्रेकरूंना गर्दीचा त्रास झाला नाही. लाखो भावीकांनी मच्छीद्रनाथांचे दर्शन घेतल्या नंतर मंदिर परीसरा भाविकांना खाण्या पिण्याची मोफत व्यवस्था होती.यात्रेनिमित्त मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिरावर
आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने रात्री मंदिर खुलून दिसत होते.मंदिर व मंदिर
परिसरात आकर्षक फुले व फुग्यांनी केलेली सजावट येणाऱ्या
भाविकांचे लक्ष वेधत होते .दुपारी देवतलाव येथुन कोठी मिरवणुक वाजत
गाजत निघाली. नाथांचे अश्व भगवे निशान या मिरवणुकीत होते.गुलालाची उधळण, फटाक्याची अताशबाजी , व ढोल ताशाचा निनादात कोठी मिरवणुक
मंदिरस्थळी आली. यावेळी कोठी मिरवणुकीत मोठया संख्येने भाविक ग्रामस्थ उपस्थीत होते.शुद्ध तुपात
तयार केलेले रोट भाविकांना वाटण्यात आले.दरवर्षी प्रमाणे नगरचे नवनाथ सेवा मंडळाने दिवसभर भाविकांना महाप्रसादाचे
वाटप केले. देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे सचिव बाबासाहेब म्हस्के,विश्वस्त अनिल म्हस्के यांनी येणाऱ्या
भाविकांचे स्वागत केले. सर्व विश्वस्त मंडळ सावरगाव ग्रामस्थ व कर्मचारी यांनी
यात्रा नियोजनासाठी परिश्रम घेतले. आज ( ता. २२) रवीवार कुस्ती हंगामा संपन्न होऊन
धर्मनाथ बिजेला यात्रेची सांगता होईल.
मच्छिंद्रनाथ देवस्थान समितीच्या वतीने यात्रेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरातील सुमारे शंभर एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.मात्र ही व्यवस्था ही अपुरी पडली.प्रंचड गर्दीमुळे बहुसंख्य भावीकांनी गो शाळेच्या आवारात व रस्त्याच्या कडेला वाहने पार्कींग करत पायी चालत मंदीराकडे आले.मायंबा ते सावरगाव पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शनि अमावस्या निमित्त श्रीक्षेत्र मढी येथे लाखो भाविकांनी चैतन्य
कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच तिसगाव मढी
रस्त्यावर वाहतूक कोंडीला सुरूवात झाली होती.वाहतूक
नियंत्रक यंत्रणाच उपलब्ध नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
रस्त्याच्या कामाची पडलेल्या खडीमुळे एकाचवेळी वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे भाविकांना
मनस्ताप सहन करावा लागला. ऐनवेळी निवडूंगे मार्गे वाहने वळवल्याने दुपारनंतर
वाहतूक सुरळीत झाली .दिवसभर एकेरी वाहतूक ठेवण्यात आली होती .आमदार संग्राम जगताप
यांनी देवस्थानला भेट देऊन कानिफनाथांचे दर्शन घेतले. मढी देवस्थान समितीने भाविकांना सुविधा देत योग्य नियोजन केले. देवस्थानचे
अध्यक्ष बबन मरकड व सचिव विमलताई मरकड, यांनी येणाऱ्या भाविकांची स्वागत केले.
0 Comments