करंजी - महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे,स्वतःच्या पायावर उभे राहुन स्वतःची उपजीविका
भागविता यावी,यासाठी भोसे गावातील महिलांनी एकत्र येवुन
स्वतःचा रोजगार स्वतः शोधला असुन जैविक शेतीसाठी दशपर्णीअर्क व अमृतपाणी खते तयार
केली आहेत.
पाथर्डी तालुक्यातील भोसे येथील महिलांनी एकत्र
येवुन जैविक शेतीसाठी लागणारे खते तयार करण्याचा प्रकल्प सुरु केला. यासाठी
त्यांना ऑक्सीस बँकेच्या सीएसआर फंडातुन व वाॅटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट तिसगाव यांनी
मोलाची मदत केली. गेल्या अनेक महिन्यांपासून भोसे गावातील व परिसरात ऑक्सीस
बॅकेच्या सीएसआर फंडातुन व वाॅटर ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातुन महिलांसाठी
प्रकल्प राबविले जात आहेत. वाढत्या रोगाला आळा घालण्यासाठी सेंद्रिय शेती कशा
पध्दतीने केली जाते याचे प्रशिक्षण देवुन महिला बचत गट, शेतकरी गटामार्फत जैविक कीटकनाशके,मुरघास, निंबोळी अर्क, गांडुळखत, दशपर्णीअर्क, आणि अमृतपाणी तयार करण्याचे प्रकल्प सुरु करुन
महिलांच्या रोजगाराचा प्रश्न महिलांनी स्वतःच सोडविला आहे. रासायनिक खते आणि रासायनिक
फवारण्या कमी करुन या खतांचा वापर केल्यास पिकणारे पिक हे मानवी शरीरास हानीकारक
नसते. या जैविक खताच्या उत्पन्नातून भोसे गावातील जय बजरंग महिला बचत गटास मोठा
फायदा होत आहे.
जैविक खते तयार करण्यासाठी तसेच विक्रीसाठी
वाॅटर ऑर्गनायझेशनचे संदिप गायकवाड, किरण आव्हाड, निता गायकवाड, गणेश शिंदे,अशोक चव्हाण, सरपंच विलास टेमकर, सिआरपी उषा शिंदे मदत करित आहेत. यांच्या
मार्गदर्शनाखाली बचत गटाच्या अध्यक्षा उषा शिंदे, योगिता शिंदे, मनिषा शिंदे, संगीता शिंदे, कोमल शिंदे, रेणुका शिंदे, मिना शिंदे, छबुबाई शिंदे, गयाबाई शिंदे, पुष्पा शिंदेसह अनेक महिला काम करित आहेत.
0 Comments