१५५ कोटीच्या पिण्याची पाण्याच्या योजनेस आघाडी सरकारच्या काळात मंजुरी - अजित पवार

 

मिरी - पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी ३८ गावासाठी जलजिवन मिशन योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेस आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मिरी येथील पाणी योजनेच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले. 

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ४ कोटी २२ लाखाच्या जलजिवन योजनेंतर्गत पाणी योजनेचे उदघाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आपल्या पाच मिनिटाच्या भाषणात बोलताना ना. अजित पवार पुढे म्हणाले, हा भाग कायम दुष्काळी असल्याने या भागात नेहमीच पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. या भागाच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या योजनेसाठी आग्रह धरला होता. आघाडी सरकारच्या काळात या योजनेस मंजुरी देण्यात आल्याचे सांगुन याबाबत येथे मि जास्त बोलणार नाही, तिसगाव येथील जाहिर सभेत आपण सगळी माहिती देवु असे आपल्या छोट्याशा भाषणात सांगितले. या भागातील तिसगाव आणि मिरी या दोन गावासाठी स्वतंत्र पाईप लाईन करण्यात आली आहे. 

यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राजेंद्र दळवी, मिरीच्या सरपंच सुनंदा गवळी, राहुल गवळी, सेनेचे जिल्हाउपप्रमुख रफिक शेख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, तसेच परिसरातील अनेक गावचे सरपंच, महाविकास आघाडीचे कार्यकर्त व गावातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.


Post a Comment

0 Comments