अपघातातील जखमीस मदत करणाऱ्यास पाठलाग करून जिवे मारण्याचा प्रयत्न

 

करंजी - अपघातात जखमी झालेल्या इसमास मदत करणारे वाटसरू अभियंता श्रीराम फुंदे यांना दमदाटी, शिवीगाळ तसेच मारहाण करण्याचा प्रकार करंजी येथे घडल्याने अपघातग्रस्तांना मदत करताना विचार करण्याची वेळ आली असुन अपघात ग्रस्तांना मदत करणाऱ्यानां मारहाण करणाऱ्या गुंडावर कारवाई करण्यात अशी मागणी तालुक्यातुन होत आहे. 

पाथर्डी तालुक्यातील करंजी जवळील लमाणतांड्या नजिक भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा थार गाडीने एका मोटार सायकलवर चाललेल्या इसमास जोराची धडक दिली. या अपघातात सदर इसम जखमी अवस्थेत पडलेला होता. महिन्द्रा थार गाडीतील आरोपी १) साहिल पठाण २) खाजा शेख व ईतर तीन अनोळखी इसम यांनी जखमीला मदत करण्याऐवजी दमदाटी करुन तुला गाडी नीट चालविता येते का असे म्हणुन शिवीगाळ करीत असताना नगरहुन पाथर्डीकडे जात असलेल्या श्रीराम मच्छिंद्र फुंदे यांनी तेथे थांबुन जखमीस दमदाटी करीत असलेल्या आरोपींना विनंती केली.

तुमची चुक असताना त्यांना दम देवु नका, त्यांना ताबडतोब दवाखान्यात घ्या असे म्हणताच या गाडीतील आरोपी १) साहिल पठाण २) खाजा शेख व ईतर तीन अनोळखी इसम यांनी फिर्यादी  श्रीराम फुंदे रा. पिंपळगाव टप्पा ता. पाथर्डी यांना दमदाटी, धक्काबुक्की करुन मारहाण केली. व जिवे मारण्याची धमकी दिली. श्रीराम फुंदे हे आपली गाडी घेवुन करंजीच्या दिशेने निघाले असता करंजी बसस्थानकावर या थार गाडीतील आरोपी आरोपी १) साहिल पठाण २) खाजा शेख व ईतर तीन अनोळखी इसम रा.तिसगाव यांनी अडवुन, काही लोक जमवुन मला पुन्हा मारहाण केली. अपघातात जखमी झालेल्या पत्रकार अशोक मोरे यांनी मागुन आल्यानंतर त्यांना सोडविले.

त्यानंतरही या गाडीतील गुंड प्रवृत्तीच्या आरोपी १) साहिल पठाण २) खाजा शेख व ईतर तीन अनोळखी इसम यांनी श्रीराम फुंदे यांच्या गाडीचा पाठलाग केला. श्रीराम फुंदे यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला या महिंद्रा थार गाडीचा ड्रायव्हर साहिल पठाण रा. तिसगाव यांच्याविरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल केला आहे.पोलीस ठाण्यात सदरील गुन्ह्याची फिर्याद नोंदवुन घेण्यासाठी सुरवातीला टाळाटाळ करण्यात आली मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आल्या नंतर फिर्याद नोंदवुन घेण्यात आली. पोलिसांनी फिर्याद नोंदवुन घेण्यास टाळाटाळ का केली ? आरोपींनी गुन्हयात वापरलेली गाडी ही बिगर नंबरची होती तसेच त्यावर प्रेस असा बोर्ड लावलेला होता ही बाब गंभीर असून या बाबींचा तपास होणार आहे का ? या गुन्ह्यातील आरोपी हा तिसगाव येथील बड्या हॉटेलचे मालक असून या हॉटेलवर पोलीस अधिकारी यांची उठबस असते अशी चर्चा सुरु आहे यावरून पोलिसांचे व आरोपींचे काय व कसे संबंध आहेत हे येत्या कालावधीत समोर येणारच आहे मात्र सदर दोनही गुन्ह्याचा तपास कश्या पद्धतीने होतो याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.   


Post a Comment

0 Comments