ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साकारली डिजीटल शाळा !

 

पाथर्डी - राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जि.प. प्रा.शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या पाथर्डी येथे सोलर पॅनल व संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे श्री.नरेंद्रजी फिरोदिया, निरंजन सेवाभावी संस्था अहमदनगरचे अध्यक्ष श्री. अतुलजी डागा यांच्या हस्ते पार पडला. 

हनुमाननगर (भारजवाडी) शाळेतील मुलांचे सुंदर हस्ताक्षर व गुणवत्ता पाहून मिशन आपुलकी अंतर्गत निरंजन सेवाभावी संस्था व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन यांच्या मदतीतून या शाळेला सोलर पॅनल व संगणक कक्ष बहाल करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंडप,आकर्षक रांगोळी, फलकलेखनाने पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थीनींनी पाहुण्यांचे औक्षण केले. श्री नरेंद्र फिरोदिया, श्री.अतुल डागा व गटशिक्षणाधिकारी श्री.अनिल भवार यांच्या हस्ते सोलर पॅनल व संगणक पक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेतील विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. इयत्ता चौथीत शिकणारी शाळेची विद्यार्थिनी प्रतिक्षा बटुळे हिने संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन केले. ही शाळा विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच नाही तर जीवन शिक्षण देते असे उद्गार श्री.नरेंद्र फिरोदिया यांनी बोलताना काढले. तर आमची मदत योग्य ठिकाणी पोहोचली याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे असे श्री.अतुल डागा बोलताना म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारजवाडी गावचे सरपंच श्री.माणिक भाऊ बटुळे होते.

कार्यक्रमासाठी सिद्धार्थ सोनवणे, समीर पठाण, सतीश मुरकुटे, राघू जपकर सर, पांडुरंग बटुळे (शा.व्य.समिती अध्यक्ष) निरंजन सेवाभावी संस्थेचे इतर सदस्य, रिपोर्टर बोरा मॅडम, बालानंद टीम, परिसरातील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते पालक व आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांसाठी जेवनाची सोय शाळेच्या पालकांनी केली होती. मुख्याध्यापक श्री.लहू बोराटे यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments