पाथर्डी - दहावीच्या
परीक्षेला दोन विद्यार्थ्यांना पास करून देण्यासाठी एजंटला पुणे येथील महिला
पालकाने तीस हजार देवूनही हॉल तिकिटाचे कारण देत परीक्षेला प्रवेश न दिल्याने
विद्यार्थ्यांच्या आईने पाथर्डी बस स्थानकावर आर्त टाहो फोडल्याने काहीकाळ
गोंधळाची वातावरण होवून जिल्ह्या बाहेरील ढ गोळ्यांना कॉपी पुरवून पासिंगच
फोर्मुला राबवणाऱ्या एजंटचा गोरख धंदा उघड झाला आहे.
पुणे येथील एका महिलेच्या
दोन मुलांना पाथर्डी येथील एका एजंटाने दहावी परीक्षेत तुम्हाला कॉपी करून पास
करून देतो असे सांगून प्रत्येकी १५ हजार
रुपये उकळले परंतु ऐनवेळी एकाच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आले व दुसऱ्याचे आले
नाही त्यामुळे पुणे येथून पाथर्डी येथे दोन दिवसापासून तळ ठोकून असलेल्या मातेच्या भावना
अनावर होऊन तिने पाथर्डी बस स्थानकावरच एजंटाच्या नावाने टाहो फोडला. माझे
पैसे मला परत द्या माझ्या मुलांना मला परत घेऊन जायचे आहे,तुम्ही
मला फसवले,आम्ही
खूप गरीब माणसे आहोत,आम्ही पै-पै करून
जमवलेले पैस परत द्या ! असे
म्हणून सदर महिलेने बस स्थानकावर मोठ मोठ्याने टाहो फोडल्याने त्या
ठिकाणी बघ्यांची गर्दी
होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही सुज्ञ नागरिकांनी महिलेची समजूत काढून
तिला बाजूला घेऊन संबंधित कॉपी पुरवणाऱ्या एजंटावर फिर्याद दाखल करण्यासंदर्भात
सल्ला दिला मात्र एजंटाचा धाक व पुढील परीक्षेत पास करून देण्याच्या एजंटाच्या
आश्वासनामुळे महिलेने फिर्याद देण्याचे टाळले. यावरून
पाथर्डी तालुक्यात दहावी व बारावीच्या परीक्षेमधून लाखो रुपयांची उलाढाल करून
ढगोळ्यांना कॉपी पुरवून पासिंग करून देण्याचा फार्मूला रूढ झाल्याचा दाखला समोर
आला आहे.
.jpg)
पुणे येथील तालुक्यात
दहावीच्या बारावीच्या परिक्षेत लाखो रुपये उकळून जिल्ह्या बाहेरील अभ्यास न करता
कॉपी पुरवून पासिंग करून देणाऱ्या एजंटाचा सुळसुळाट झाला असून यामुळे मात्र
प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून
प्रशासन याकडे सोईस्कर रित्या डोळेझाक करताना समोर येत आहे.शालेय जीवनात दहावी व
बारावीच्या परीक्षेतून पुढील शिक्षणाची दिशा आणि जीवनाची दिशा ठरत असते मात्र
आर्थिक दृष्ट्या मागास व दुष्काळी असलेला पाथर्डी तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला
राज्यातील श्रीमंत वर्गातील ढ गोळ्यांना शोर्ट कट मार्गाने पासिंगचा फार्मुला रूढ
होत आहे.
दहावी व बारावी
परिक्षेत वर्षभराची हजेरी,प्रात्यक्षिक
इत्यादिना फाटा देवून तात्काळ म्हणून जिल्हाबाहेरील विद्यार्थ्याना थेट पाथर्डी
तालुक्यातील परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येत असून ऐनवेळी आलेल्या
विद्यार्थ्यांची सोय एकाच केंद्रात करण्यात आल्याने एजंटना अश्या ढ गोळ्यांना कॉपी
पुरवणे सोपे जात आहे.शहरातील उपनगरातून असलेल्या खाजगी खोल्या मधून तसेच हॉटेल लॉज
मधून स्त्री पुरूष भेदभाव न करता एकत्रित पणे अश्या बाहेरील विद्यार्थ्याची
रहिवासाची व्यवस्था करण्यात येत असून रात्री अश्या ढ गोळ्या कडून मद्य प्राशन करून
गोंधळ घालणे नित्याचे झाले आहे.
इयत्ता बारावीसाठी इमर्जन्सी समाविष्ठ
झालेल्या विदयार्थीची महाविदयालय निहाय संख्या मोठी असून इमर्जन्सी सामाविष्ठ
झालेल्या विदयार्थीचे प्रात्यक्षिक परिक्षा घेण्यासाठी केलेले नियोजन
व त्यांचे विषयनिहाय केलेले वेळापत्रक तपासणे आवश्यक झाले आहे. याशिवाय विज्ञान शाखेच्या विदयार्थीची
घेतलेली प्रात्यक्षीक परिक्षा, त्यांचे जमा केलेली जर्नल व प्रात्यक्षीक
परिक्षेची एकुण पेपरची संख्या याबाबतही खातरजमा करणे आवश्यक आहे.
तसेच ज्या महाविदयालयाची व कनिष्ठ महाविदयालयाची प्राध्यापकांची परिक्षेच्या कालावधीमध्ये सुपरवायझर म्हणुन
नियुक्ती केलेली आहे अश्या प्राध्यापक शिक्षक यांची संपूर्ण नाव शैक्षणीक अर्हता, व्यवसाईक अर्हता प्रथम नेमणुक आदेश, आधारकार्ड,शिकवत असलेले विषय इत्यादी माहिती देखील पुणे
बोर्डाने तपासली तर ढ गोळ्यांना कॉपी पुरवून पासिंगचे रेकेत उघड होईल. वर्षभरातील हजेरी व
प्रात्यक्षिक परीक्षा यावेळी गटशिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी व पुणे
विद्यापीठ यांच्याकडून होणाऱ्या तपासण्या व प्रवेश प्रक्रिया मधील ओळखपत्र तसेच
इतर बाबी यावरून सर्वच यंत्रणा यामध्ये सामील असल्याचे उघड होत आहे.
0 Comments