धनुष्यबाण चिन्हाने पक्षाचे कार्य गतिमान – विष्णुपंत ढाकणे

पाथर्डी - निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने आता अधिक गतिमान पणे पक्ष कार्य होणार आहे.तसेच अनेक कार्यकर्ते पक्षाकडे आकर्षित होणार असुन सर्वांचा सन्मान करून योग्य असा न्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील.पदाधिकाऱ्यांनी देखील पक्ष वाढीसह,जनसेवेचे कार्य अधिक जोमाने करावे.असे प्रतिपादन शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विष्णुपंत ढाकणे यांनी केले.

शिवसेना पक्षाच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सागर गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली.गायकवाड यांना निवडीचे पत्र दिल्यानंतर ढाकणे बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप पालवे,आकाश वारे,नाना राऊत,सुरेश हुलजुते,आजिनाथ खेडकर,बाबासाहेब औटी,इरफान शेख,जालिंदर बेळगे आदी उपस्थित होते.तर यावेळी गायकवाड म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार व पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली शहर व परिसरात शिवसेनेच्या शाखा स्थापन करून,सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे रेंगाळलेले छोटे मोठे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.शिवसैनिकांचे संघटन वाढवून तळागाळापर्यंत पक्षाचे विचार पोहोचवण्यासाठी कार्य करु.सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी लवकरच युवक व महिलांचा स्वतंत्र रोजगार मेळावा घेणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments