वांबोरी चारी टप्पा दोनला प्रशासकीय मंजुरी,९९ कोटीचा निधी मंजुर - संभाजीराव पालवे यांची माहिती

करंजी - पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागास वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असुन या योजनेसाठी ९९ कोटीचा निधी मंजुर झाला असुन लवकरच या योजनेचे काम प्रत्यक्ष सुरु होवुन खऱ्या अर्थाने डोंगराच्या कडे-कडेने मुळा धरणाचे पाणी या भागातील शेतीसाठी मिळणार आहे. 

पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा कायमस्वरुपी दुष्काळी भाग म्हणुन ओळखला जातो. या भागातील शेतीला पाणी मिळावे म्हणुन या भागातील शेतकऱ्यांनी या पाण्यासाठी ५० वर्षापुर्वी लढा उभारला होता. वांबोरी पाईप लाईन झाली मात्र या योजनेतून या भागातील डोंगराच्याकडेची गावे मात्र वंचित राहिल्याने या भागासाठी वांबोरी चारी टप्पा दोन ही योजना समोर आली. या योजनेत पाथर्डी तालुक्यातील शिराळ, चिचोंडी, कोल्हार, गितेवाडी, डोंगरवाडी,डमाळवाडी, पवळवाडी, लोहसर,वैजुबाभुळगाव, दगडवाडी, करंजीसह १२ गावातील ३२ पाझर तलावांचा समावेश आहे.

मुळा धरणापासुन लोखंडी पाईपच्या सहाय्याने या ३२ पाझर तलावात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी दिली. या योजनेस मंजुरी मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन वरिष्ठ पातळीवर बैठका घेण्यात आल्या.यासाठी माजी मंत्री जयंत पाटील, माजी खासदार प्रसाद तनपुरे, विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे, स्व. राजाभाऊ राजळे यांनी सहकार्य करुन पाठपुरावा केल्याचेही पालवे यांनी सांगितले. अंदाजे १६० कोटी रुपयांच्या या योजनेस ६१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होता. परंतु त्यासाठी आणखी ९९ कोटी रु. निधीची तसेच वनविभागाच्या परवानगीची गरज होती. या सर्व अडचणी आता दुर झालेल्या असुन या योजनेच्या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होवुन या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी ५० वर्षापुर्वी पाहिलेले स्वप्न पुर्ण होणार असल्याचेही संभाजीराव पालवे यांनी सांगितले.

पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोनला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या योजनेला मंजुरी मिळावी म्हणुन मि व स्व. मोहनराव पालवे २००७ पासुन पाठपुरावा करित होतो, अखेर १७ वर्षानंतर यश आले असे पंचायत समिती माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी सांगितले. 

 

Post a Comment

0 Comments