मिरी -
लहानपणापासुन मुलांना अध्यात्माची आवड निर्माण झाली तर पुढील पिढी ही आदर्श व
सुसंस्कारी बनेल असे मत ह.भ.प. गंगाधर महाराज गाडेकर यांनी मिरी येथील वारकरी
शिक्षण संस्थेचा भुमिपुजन कार्यक्रमप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
पाथर्डी तालुका हा
संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमि आहे. अनेक देव-देवतांनी या भागात वास्तव्य
केल्याचे पुरावे पुराणात आढळतात. अशा या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मिरी
गावात माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने वारकरी शिक्षण संस्थेचे भुमिपुजन होत
असल्याने समाधान वाटले. लहान मुलांना अशा धार्मिक शिक्षणाची आज गरज असल्याचे
सांगुन गाडेकर महाराज म्हणाले,
लहान वयापासुनच मुलावर धार्मिक
संस्कार झाले तर पुढील पिढी आदर्श व संस्कारी होईल. यामुळे देश भावना वाढीस लागुन
या देशातील आदर्श नागरिक म्हणुन समाज त्यांच्याकडे पाहिल.
या
कार्यक्रमाच्यावेळी संस्थेचे संस्थापक महेश तागड, डाॅ. बबनराव नरसाळे आदींनी भाषणे
केली. यावेळी डाॅ. बबनराव नरसाळे,
मिरीचे उपसरपंच संजय शिंदे, भागिनाथ गवळी, सुभाष गवळी, विजय गुंड, एकनाथ झाडे, संतोष शिंदे, शुभम मोटे, संजय नवल, बाबासाहेब निमसे, विशाल नवघरे, अशोक झाडे, अशोक दहातोंडे, जगन्नाथ वेताळ, दादासाहेब जाधव, बंडु तोगे, लक्ष्मण सोलाट, बाबासाहेब जाडे सह
अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.
0 Comments