पाथर्डी - तालुक्यातील अडल्या नडलेल्या लोकांना प्रशासन वेठीस धरत आहे.लोकांचे साधे रेशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठी पाचशे ते हजार रुपये मोजावे लागत आहे.आपण याचा जाब का विचारीत नाही. सगळ्याच शासकीय कार्यालयात लोकांकडून पैसे उकळण्याचे काम होत असुन यातून मोठा उद्योग सुरू आहे.
त्यावरती आपण एक शब्दही बोलत नाही. ताई तुमची अडचण कळते हो, सगळेच हप्ते बांधून घेतले म्हणून आमच्या बहिणीची ती अडचण झाली आहे. त्यामुळेच प्रशासनावरती वचक नाही. अशी घनाघाती टीका केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अँड प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर केली आहे.
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव पंचायत समितीच्या गणात कोरडगाव या ठिकाणी संवाद यात्रेच्या निमित्ताने ढाकणे उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे,अनिल ढाकणे,वैभव दहिफळे,सिताराम बोरुडे,दिगंबर गाडे,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के, उध्दव दुसंग,स्वप्निल देशमुख, त्रिंबक देशमुख,महारुद्र कीर्तने,अनिल बंड, अण्णासाहेब मुखेकर, राजु काकडे,भाऊसाहेब फुंदे, बशीर शेख, सिताराम शेळके आदी उपस्थित होते.
ढाकणे म्हणाले की,शासकीय कामासाठी जनतेची अक्षरशः पिळूक होत आहे तरी तुमचा एक शब्द निघत नाही. प्रशासनातील सर्वच खात्यांमध्ये तुमचे हप्ते असल्यामुळे प्रशासनापुढे तुम्ही बोलू शकत नाही,परिणामी प्रशासनावर तुमचा दाब राहिला नाही.तुमच्या आमदारकीच्या साडे आठ वर्षात तुम्ही कोणते ठोस कामे केले नाहीत.तालुक्यात आजही विज,रस्ते,पाणी हे साधे -साधे प्रश्न मोठ्या प्रमाणावर भिडसावता असून याची सोडवणूक होत नसेल तर तुमची आमदारकी फक्त सोयऱ्या धायऱ्यामध्ये मिरवण्याकरता आहे का? तुमचा मोठेपणाचा तुरा मिरवण्यासाठी ही आमदारकी नसून लोकांचे सेवा करावी, प्रश्न सुटावेत म्हणून तुम्हाला तालुक्याचा कारभार बघायला कारभारी केला आहे.तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी जातीपातीचे राजकारण तुम्ही आज पर्यंत करत आहात.तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मी विरोधी पक्षाचा प्रमुख आहे या हक्काने तुम्हाला जाब विचारत आहे. तुमच्या आमदारकीचा तालुक्यासाठी काहीच उपयोग होत नाही म्हणून आमच्या ताईला मी हिशोब मागतोय त्या काही द्यायला तयार नाहीत. असेही शेवटी ढाकणे आमदार मोनिका राजळे यांना म्हणाले.
पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करायचे म्हणून मला (मोनिका राजळे)आमदार करा असा त्यांचा अजंटा होता. पंकजा मुंडे यांना मी गुरु बहीण मानतो, मग त्या दिवशी गहीनाथ गडावर नाना फडणवीस (देवेंद्र फडणवीस) आले होते आमच्या गुरुबहीण आल्या नव्हत्या, माझी मोठी बहीण (पंकजा मुंडे) ह्या गडावर आल्या नाहीत तर मी (मोनिका राजळे)सुद्धा गाहिनाथ गडावर जाणार नाही. खरं तुमचं मुंडे कुटुंबाविषयी प्रेम वाटलं असतं. असे अँड ढाकणे म्हणाले
औरंगाबादचे (भागवत कराड) केंद्रीत राज्यमंत्री झाले त्याबद्दल वाईट वाटायचं काहीच कारण नाही,पण आमच्या छोट्या गुरु बहिण बीडच्या खासदार (डॉ प्रितम मुंडे) त्या मंत्री झाल्या पाहिजे होत्या लोकांची भावना होती. त्यांना मंत्री केलं नाही त्याबद्दल पिंपळगावच्या आमच्या बहीण ( आमदार मोनिका राजळे) यांनी साधा निषेधही व्यक्त केला नाही. उलट तुम्ही औरंगाबाद वाल्यांना व्हाईट हाऊस वर आणून सत्कार सन्मान केला. कुठे तुमचं बहिणीचं प्रेम गेलं? असा सवाल ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांना केला.
0 Comments