३ हजाराची लाच स्वीकारताना शेती महामंडळाचा कर्मचारी पकडला

अहमदनगर – महाराष्ट्र शेती महामंडळाच्या नावे असलेली जमीन कसण्यासाठी डिग्रस ता.राहुरी येथील तक्रारदार शेतकरया कडून ५०००/- पाच हजारांची लाच मागणी करून तडजोडी अंती ३०००/- तीन हजार लाच स्वीकारल्या प्रकरणी लोकसेवक आरोपी नवनाथ अशोक थोरात, पद- राखणदार,नैमित्यिक कामगार,महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ,यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार हे डिग्रस, ता- राहुरी, जि.अहमदनगर येथील शेती व्यवसाय करत असुन, त्यांची उकलगाव ता श्रीरामपूर येथील गट न ३०२/०४ मधील १२ एकर वडिलोपार्जित जमीन त्यांचे पणजोबा यांनी शेती महामंडळ टिळकनगर यांच्या कडे खंडण्या साठी सन १९७० मध्ये दिली होती, त्या नंतर १९९७-९८ मध्ये मा महसूल आयुक्त नाशिक याच्या आदेशान्वये उक्कलगाव शिवारातील शेत गट न १६८ मध्ये ०४एकर क्षेत्र तक्रारदार यांचे पणजोबा यांचे नावे तक्रारदार यांच्या कुटुंबियांना कसण्यासाठी मिळाली आहे, सदर शेत जमीन च्या सात बारा उतारा वर वारसा प्रमाणे २००६ पर्यंत ची वारसा नोंद बरोबर लावण्यात आली होती ,सन २००६ मध्ये तक्रारदार यांच्या आई चे वारस म्हणून नाव ७/१२ उतारा वर नोंद लावण्यात आलेली होती.

परंतु २००७ पासून ७/१२ उतारा वर आई चे नाव नसल्याचे तक्रारदार यांना २०१३ मध्ये लक्षात आले,त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांच्या आईचे नावे उप विभागीय अधिकारी,श्रीरामपूर यांचेकडे अपील अर्ज केला होता त्यावर २०२० पर्यंत कोणताही आदेश पारित झाला नाही त्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा आई च्या नावे उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडे वारस हक्काप्रमाणे ७/१२ वर नाव नमूद करण्यासाठी डिसेंम्बर २०२२ मध्ये अर्ज केला आहे,त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे,सदर जमीन तक्रारदार स्वतः कसत आहेत,दिनांक २९/०१/२०२३ रोजी आरोपी यांनी तक्रारदार यांना फोन करून सांगितले की, सदर जमीन महाराष्ट्र शेती महामंडळाच्या नावे आहे ती तू कसु नको,जर ती जमीन तुला कसायची असेल तर तू मला ५०००/-दे, मी तुला सदर जमीन कसु देईल असे म्हणून लाच मागणी केली बाबत ची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक २ फेब्रुवारी रोजी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे दिली होती.

सदर तक्रारीचे अनुषंगाने आज रोजी बेलापूर येथे पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे ५,०००/- लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ३०००/-लाच मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले. त्यावरून बेलापूर नाका प्राची फरसाण दुकाना जवळ लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष ,०००/- लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यवाहीत सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोर्डे,पोलीस नाईक रमेश चौधरी,अंमलदार,वैभव पांढरे, बाबासाहेब कराड,रविंद्र निमसे चालक हारून शेख आदी सहभागी झाले होते.  

 


Post a Comment

0 Comments