पाथर्डी तालुक्यात निर्धूर चुलींसाठी ग्रामीण महिलांची फसवणूक

पाथर्डी - तालुक्याच्या पुर्व भागातील काही गावात बचतगटाच्या महीलांना निर्धुर चुल (विनाधुराचीचुल)मिळेल असे सांगुन आँनलाईन फाँर्म भरुन घेण्यासाठी प्रत्येक महीलेकडुन दोनशे रुपये घेण्यात येत असून महीला आर्थिक विकास मडंळाच्या वतीने एका खाजगी कंपनीच्या मदतीने चुल वाटप करण्याची माहीती दिली जाते, केवळ सर्वेक्षण चालु असताना शंभर ते दोनशे रुपये फाँर्म भरण्याचे स्थानिक महीलांनी जमा केले आहेत,याबाबत चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे तालुका व्यवस्थापक बाबासाहेब बांगर यांनी सांगितले. 

बचत गटातील महीलांची आर्थिक लुट करणारे नेमके कोण आहेत याची चौकशी होवुन संबधीतावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. येळी, खरवंडी परीसरातील अनेक गावात बचत गटाच्या महीलांना या निर्धुरचुल देण्याचे सांगितले जात आहे. तुमचा फाँर्म आँनलाईन भरावयाचा आहे. तिन हजार रुपये किमतीची निर्धुरचुल मोफत मिळणार असल्याने त्यासाठी फाँर्म भरायला
दोनशे रुपये मागितले जातात. अनेक महीलांकडुन दोनशे रुपये घेतले आहेत. काही गावात शंभर रुपये महीलेप्रमाणे पैसे जमा केले आहेत. फाँर्म भरणा-या महीलांची संख्या लक्षात घेता सुमारे चारशे ते पाचशे महीलांचे अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. आणखी अनेक गावात महीलांना आर्थिक लुबाडणुक सुरु असल्याच्या तक्रारी महीलांनी केल्या आहेत.

बचत गटातील महीलांची नावे उघड करु नका अन्यथा आम्हाला कर्ज व शासकिय योजना मिळणार नाहीत अशी धमकी संबंधिताकडुन दिली जाते. बचत गटाच्या महीलांची आर्थिक फसवणुक झालेली आहे. संबंधित महीलांना दोनशे रुपये परत करा अन्यथा अंदोलन करण्याचा इशारा खरवंडी व येळी गावातील काही महीलांनी दिला आहे. आम्ही लेखी तक्रार देत अहोत. मात्र आमची नावे गुप्त ठेवा अशी मागणी महीलांनी केली आहे. बचत गटाच्या महीलांची नेमकी किती रुपयाची फसवणुक झाली याची चौकशी झाली तर बरेच काही प्रकार बाहेर येतील. महीलांच्या अज्ञानाचा फायदा घेवुन त्यांची लुबाडणुक होत असल्याने अधिका-यांनी याची चौकशी करावी अशी मागणी महीलांनी केली आहे.

बचत गटाच्या महीलांना निर्धुरचुल देण्याचे सर्वेक्षण सुरु आहे. मात्र त्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. आम्ही कोनालाही पैसे घेण्याचे सांगितले नाहीत. कोणी पैसे घेतले असतील तर चौकशी करु. पैसे घेवु नयेत अशा सुचना गाव पातळीवर काम करणा-या महीला व त्यांच्यावर नियंत्रण करणा-या महीलांना देत आहे असे पाथर्डी महीला आर्थिक विकास मंडळाचे व्यवस्थापक,बाबासाहेब बांगर यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments