पाथर्डी - निष्ठा सेवा व भक्तीचा सुरेख संगम संत
नरहरी महाराजांच्या जीवन कार्यात झालेला असून श्रेष्ठ दर्जाची सेवा परमेश्वराला
सर्वाधिक प्रिय असून संतांच्या मार्गाने मार्गक्रमण करून साधकांनी कल्याण साधावे
असे आवाहन बद्रीनाथ महाराज पैठण यांनी केले.
संत नरहरी महाराज
यांच्या ७३७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी
प्रमुख पाहुणे म्हणून वारे महाराज' उद्योजक बंडू भांडकर' अमोल गर्जे, माजी नगरसेवक
रामनाथ बंग,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,मोहटा देवस्थानची
पुजारी बाळासाहेब मानूरकर आदी ऊपस्थीत होते. पैठण येथील वारकरी शिक्षण संस्थेचे
टाळकरी पथक महिला भजनी मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते.यावेळी टाळांच्या गजराने
संपूर्ण वातावरण भारावून गेले. सकाळी महाराजांच्या पादुकांचे पूजन व विठ्ठल
रुक्मिणी मूर्तीला अभिषेक कार्यक्रमानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. विविध संत
महंतांच्या मार्गदर्शनानंतर महाआरती होऊन महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. संत
नरहरी महाराज सर्व सुवर्णकार मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत चिंतामणी, कार्याध्यक्ष
नंदकुमार डाळिंबकर,उपाध्यक्ष चंद्रकांत शहाणे,सचिव योगेश घोडके यासह अमोल चिंतामणी,अरुण
पंडित,सिद्धांत शहाणे, दिगंबर जोजारे, सतीश पानगे,किरण काजळे,महेश पारखे, मेघना
चिंतामणी आदींसह सर्व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. विष्णू चिंतामणी यांचे
वतीने महाप्रसाद पंगत देण्यात आली.
यावेळी बोलताना
महाराज म्हणाले समाजात सध्या अत्यंत विषम वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक जण
तणावग्रस्त अवस्थेत जगत आहे. भोगांचा अतिरेक दुःखाला कारणीभूत ठरत असून धार्मिक
विचारांसह त्याग सेवाभाव व समाधान वृत्ती मनुष्याला स्थैर्य देणारी ठरणार आहे. संत
नरहरी महाराजांची सेवा शिव व हरी अशा साधनेतून एकत्वाची शिकवण देत पांडुरंग
स्वरूपात विलीन झाली ईश्वराचे आराध्य स्वरूप कोणतेही असले तरी शेवटी सर्व सेवा
परमपिता परमेश्वराला जाऊन पोहोचते असा संदेश साधकाला नरहरी महाराजांच्या
चरित्रातून मिळतो. संत विचारांची कास धरून सुवर्णकार समाजाने जीवनाचे कल्याण
साधावे असे आवाहन पैठणकर महाराजांनी केले. पाथर्डी शहरात उत्सवाचे ५६ वे वर्ष आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून नंदकुमार डाळिंबकर यांनी आभार मानले.
0 Comments