
पाथर्डी - आमदार होताना पंकजाताई मुंडे यांच्या बहीन असतात,स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांचे आदर्श असतात मात्र ह्या आमदार झाल्यावर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे नेते कसे होतात,गहीनीनाथ गडावर पुण्यतिथीला देवेंद्र फडणीस आले होते तेथे पंकजा मुंडे आल्या नव्हत्या. मग आमच्या बहीनबाई (मोनिका राजळे ) तेथे कशा गेल्या होत्या. तुमच्या स्वार्थाचे व टक्केवारीचे राजकारण आमच्या समजण्याच्या पलीकडचे असल्याची टिका राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी केली.
खरवंडी येथे भाऊ-बाबा मंगल कार्यालयात महाआघाडीच्या सवांद यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ढाकणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आण्णासाहेब खेडकर होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, गहीनीनाथ शिरसाट, बंडुपाटील बोरुडे, किरण खेडकर, राजेंद्र हिंगे, राजु जगताप, विष्णु थोरात, उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भगवानराव दराडे, बाळासाहेब बटुळे, बाळासाहेब दराडे, भगवान हजारे, दिपक ढाकणे,पप्पु दहीफळे, सिताराम बोरुडे, दिगंबर गाडे, हुमायुन आतार, सरपंच सुरेखा ढाकणे, गणेश सुपेकर, अनिल ढाकणे, आंबादास राऊत, बाळासाहेब जगताप, उद्धव दुसंग, आबासाहेब जायभाये उपस्थीत होते. यावेळी बोलताना ढाकणे म्हणाले, मी आमच्या बहीनबाई (मोनिका राजळे यांना) बाराशे कोटीचा निधीचा हिशोब मागितला. मी विरोधी पक्षात असलो तरी मला एक लाख लोकांनी मते दिले आहेत. मला हिशोब मिळाला नाही. मतदार संघातले प्रश्न जसे होते तसेच आहेत. मग विकास नेमका कोणाचा झाला. आमदार झाल्या की तुम्ही तुपाशी अन जनता उपाशी हे कसे होते.
पाथर्डी शहरात व्यापारी व त्यांच्या जागा देखील सुरक्षीत राहले नाहीत. गुंडाकडुन जमीनी बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. हे गुंड कोणाच्या आशिर्वादाने हे करीत आहेत. मार्केट कमिटीच्या गेटवर अतिक्रमण झाल्याने शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची अडवणूक होत आहे गेट वरील अतिक्रमणे कोणाची व कोणाच्या आशीर्वादाने आहेत हे जनतेला सर्व समजते आहे. अतिक्रमणे करणा-यांच्या दुकानाचे उद्घाटन तुम्ही करात म्ह्णजे तुमची भागीदारी आहे समजायचे का ? जनतेला सर्व समजतेय. हे थांबले पाहीजे. शहरातील बाजारपेठ वाचली पाहीजे असे अँड. ढाकणे यांनी यावेळी सांगितले.
तुमचे मुंडे साहेबावरचे प्रेम मते घेण्यापुरतेच आहे का ? पाच वर्षापुर्वी पाथर्डीत मुंडे यांचा पुतळा लोकवर्गणीतुन करण्याची घोषणा केली. लोकवर्गणी गेली कुठे? पुतळा गेला कुठे ? पाथर्डीचे गटारीचे पाणी जाते तिथे मुंडेंचा पुतळा उभारणार का ? व कधी उभारणार हे जाहीर करा. पंकजाताईला मुख्यमंत्री करण्यासाठी तुम्ही मते मागितले पंकजाताई नेमक्या कुठे आहेत? राजळेंनी हा भुलभुलैय्या थांबवावा. तुम्ही नागपुरच्या अनाजी पंतांच्या समर्थक अहात. मुंडेचे नाव केवळ मतापुरते वापरता हे जनतेला समजलय. केंद्राचे व राज्याचे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतीपिकाला भाव नाहीत. महागाई , बेरोजगारी वाढली. युवक दिशाहिन झालेत. महाआघाडीचे सरकार होते तेव्हा कापसाला दहा हजाराचा भाव होता आता सात हजार भाव का झालेत. जनतेने हे ओळखले पाहीजे.
मी काल नाराज नव्हतो आजही नाही व उद्याही नाराज राहणार नाही.मात्र एकवेळ मला संधी द्या व पंचायत समिती, जिल्हा परीषद, बाजार समिती व नगरपालिका सर्व संस्था माझ्या विचाराच्या लोकांच्या हातामधे द्या. तुम्हाला बदल झालेला दिसेल. भाजपाचे खरे रुप वेगळे आहे. दाखवायचा चेहरावेगळा आहे. उद्योगपतीच्या हिताचे काम करणारे हे सरकार आहे.उद्योगपतींनी पैसे दिले म्हणुन हे निवडणुका जिकंले आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांचे भाजपने काय केले आपण पहात आहोत. भाजपा फसवा पक्ष आहे. स्वर्गीय गोपिनाथ मुंडे हे सुद्धा संघाच्या लोकांना विटले होते. भाजपा सोडुन काँग्रेसमधे जाण्याची मानसिकता त्यांची झाली होती हे मी डोळ्यांनी पाहीलेले आहे असे ढाकणे म्हणाले. किरण खेडकर यांनी प्रस्ताविक करुन सुत्रसंचालन केले. महारुद्र किर्तने यांनी आभार मानले.
0 Comments