अपघातग्रस्तांना मदत करणारांना मारहाण करणारावर कारवाईची मागणी

करंजी - नगर-पाथर्डी महामार्गावर करंजी जवळील लमाण तांड्या जवळ महिन्द्रा थार गाडीने पत्रकार अशोक मोरे यांना पाठीमागुन जोराची धडक देवुन जखमी केले, अपघातात जखमी झालेल्या मोरे यांना मदत करणाऱ्या श्रीराम फुंदे यांनाच अपघात करणाऱ्या गुंडांनी मारहाण केली. फुंदे यांना मारहाण करणाऱ्या गुंडावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी परिसरातील अनेकांनी केली आहे. 

करंजी-तिसगाव परिसर हा गेल्या काही दिवसापासुन गुन्हेगारांचे केंद्रबिंदु ठरत असुन या भागातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे राजरोसपणे चालु आहेत. या भागात घडलेल्या अनेक गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले असुन या भागातील नागरिकात भितीने वातावरण निर्माण झाले आहे. करंजीपासुन काही अंतरावर मराठवाड्याची हद्द सुरु होते. गुन्हेगार काही मिनीटात जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जातात. करंजी औटपोस्टला कायमस्वरुपी पोलिसांची नेमणुक करावी ही मागणीही आता जुनी झाली.

पत्रकार अशोक मोरे यांच्या मोटार सायकलला पाठीमागुन भरधाव वेगाने आलेल्या महिन्द्रा थार गाडीने जोराची धडक देवुन जखमी केले. नगरहुन पाथर्डीकडे जात असलेल्या श्रीराम फुंदे यांनी अपघात करणाऱ्या महिंद्रा थार गाडीचा चालक साहिल पठाण रा. तिसगाव व अन्य चौघांना समजावुन सांगण्याचा प्रयत्न करीत असताना श्रीराम फुंदे यांनाच दम देवुन, मारहाण करुन शिवीगाळ करुन, पाठलाग करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पत्रकार अशोक मोरे व श्रीराम फुंदे यांनी या गुंडावर पाथर्डी पोलिस स्टेशनला दोन गुन्हे दाखल केले आहेत. मात्र स्थानिक पोलिसांची भुमिका पहाता या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा अशी मागणी राजेंद्र पाठक, नवनाथ पाठक, हिम्मत पडोळे, पंढरीनाथ चोथे,विलास टेमकर, अशोक टेमकर, उध्दव गिते, तसेच पत्रकार उमेश कुलकर्णी, हरिहर गर्जे, अविनाश मंत्री, नारायण पालवे, संदिप शेवाळे, अनिल खाटेर, तुळशीदास मुखेकर, विलास मुखेकर, एन. टी. व्ही.चे टेमकर आदींनी केली आहे.

या गुन्ह्याच्या तपासाबाबत पाथर्डी पोलिसांची भुमिका संशयास्पद असल्याने या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात यावा या मागणीसाठी तालुक्यातील पत्रकारांचे शिष्टमंडळ लवकरच जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेणार आहेत.

 

Post a Comment

0 Comments