अबब नदी पात्रातून कोट्यावधींची गटार गंगा, सामाजीक कार्यकर्ते आक्रमक !

पाथर्डी – शहरातील खोलेश्वर देवस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सध्या अजब गजब रीतीने चक्क नदीपात्रातूनच गटारीचे बांधकाम करण्यात येत असून या कोट्यावधीच्या बांधकामासाठी यापूर्वी तीर्थक्षेत्र विकास निधीतून बांधण्यात आलेल्या पार्किंग व कुस्ती आखाडा हि कामे या कामाच्या ठेकेदारा कडून उध्वस्त करण्यात आली असल्याने या बाबत तालुक्यातील जनतेतून या अजब गजब कामा बाबत पालिका प्रशासन व या कामाचे ठेकेदार तसेच संबधित लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकेवर जनतेमधून टीकेची झोड उठली आहे.

महाराष्ट्र राज्य प्रशासनाकडून राज्यात नदी पुनर्जीवन व स्वछता मोहीम राबवली जात असून या मोहिमे अंतर्गत राज्यभरातील नदीपात्रातील अतिक्रमणे हटवण्यात येत आहे. मात्र पाथर्डी पालिकेने या मोहिमेला हरताळ फासला असून पर्यावरण कायद्याला गटारीत बुडवत चक्क नदी पत्रातूनच एक कोटी रुपयांची गटार बांधण्याचा अनोखा उपक्रम पालिका प्रशासनाने सुरु केला आहे. यापूर्वी देखील खोलेश्वर तीर्थ क्षेत्र विकास निधी अंतर्गत नियमबाह्य रित्या नदीपात्र बुजवून कोट्यावधी रुपयांची पार्किग व कुस्ती आराखडा निकृष्ठ दर्जाचे बांधण्यात आला होता. जनतेच्या करातून जमा झालेल्या निधीचा अपव्यय करत या कामासाठी मात्र स्थानिक पुढारी,नगरसेवक व कॉपी  करून पास झालेले अभियंते व लाचार पालिका अधिकारी यांना पर्यावरण कायद्याचा विसर पडला असून या कामातून मिळणाऱ्या टक्केवारीच्या मोहा पाई चक्क या महाभागानी नदी पात्र खोदून  एक कोटी रुपयांची सिमेंट गटार बांधकाम सुरु केले आहे. यामुळे मात्र नदी पात्रात अतिक्रमण होवून पुराच्या पाण्याचा फुगवता होवून याचा धोका कसबा पेठ परिसराला बसू शकतो असे तज्ञांचे मत आहे.


पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नदी पात्रात गटारीचे काम कुठल्या आधारावर मंजूर केले याची शहरात उलट सुलट चर्चा सुरु असून या कोट्यावधी रुपयांच्या कामाची तात्काळ चौकशी करून या मध्ये कोणकोणते पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी सहभागी आहेत याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खोलेश्वर तीर्थ क्षेत्र विकास योजनेच्या निधीचा चुकीच्या मार्गाने चुकीच्या ठिकाणी वापर केल्याचा ठपका ठेऊन फौजदारी गुन्हा पालिकेने संबधिता विरुद्ध नोंदवावे अन्यथा पाथर्डी पालिके समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी दिला आहे तर याबाबत हरित लवाद तसेच उच्च न्यायालयात खोलेश्वर देवस्थान व पालिका प्रशासना विरूद्ध या चुकीच्या कामाबाबत तसेच यापूर्वीच्या कामाबाबत जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. हरिहर गर्जे यांनी सांगितले.

 


Post a Comment

0 Comments