पाथर्डी - विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सुप्त गुणांना वाव
देण्याच्या उद्देशाने पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद प्राथमिक
विद्यामंदिर या शाळेने आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्या
विद्यार्थी कलाकारांना प्रेक्षकांनी उस्फूर्त दाद देवून कलागुणांचे कौतुक केले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पार्थ
विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक
प्रवीण पाटील, शेवगाव गटशिक्षण अधिकारी तृप्ती कोलते,
माजी मुख्याध्यापक अशपाक सय्यद, माध्यमिक
विभागाचे मुख्याध्यापक शरद मेढे,समन्वयक ज्ञानेश्वर गायके,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, पर्यवेक्षक संपत घारे,महेंद्र तांदळे, सतीश डोळे, संतोष बडे तसेच पालक उपस्थित होते.
उत्कृष्ट रोषणाई व साऊंड सिस्टिम, दिमाखदार भव्य- दिव्य स्टेज व चिमुकल्यांचे उत्कृष्ट नृत्य व प्रचंड पालकवर्ग प्रतिसाद यामुळे उपस्थित मान्यवर व पालक यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. उपस्थित सर्वच पालकांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्ती नृत्य, वारकरी नृत्य, कोळी नृत्य,शेतकरी नृत्य, हिंदी व मराठी चित्रपटातील गीत, भारुड, गीत गायन, लावणी नाटिका असे उत्कृष्ट कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमातून उपस्थितांना विविध संदेश दिले. झाशीची राणी
लक्ष्मीबाई यांच्या जीवन चित्रावरील प्रसंग नृत्यातून सादरीकरण केल्याने उपस्थित
प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली. मुक अभिनयातून पाणी बचतीचा संदेश दिला. नाटिकेच्या
माध्यमातून मोबाईलचे होणारे दुष्परिणाम याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.कार्यक्रमाचे
प्रास्ताविक अनुजा कुलकर्णी तर सूत्रसंचालन आशा बांदल, मनीषा
गायके यांनी केले तर ज्ञानेश्वर गायके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी जयश्री एकशिंगे, राधिका सरोदे ,ज्योती हम्पे, जयश्री खोर्दे, कीर्ती
दगडखैर, ऋषिकेश मुळे, ज्ञानेश्वरी
मुरहे,प्रमोद हंडाळ,बाळू हंडाळ,
कैलास भोसले, आदिनाथ फाजगे, आजिनाथ शिरसाट यांनी परिश्रम घेतले.
0 Comments