पाथर्डी
- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या
जन्मदिना निमित्त पाथर्डी तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने
रक्तदान शिबीर तसेच अन्नदान आदीसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची
माहिती पक्षाचे तालुका प्रमुख विष्णुपंत ढाकणे यांनी दिली.
यावेळी
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये गुरुवारी रक्तदान
शिबिरामध्ये पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन ६० बॉटल रक्त
संकलित केले यावेळी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रुग्णालयातील रुग्णांना
फळ वाटप करण्यात आले यावेळी उपस्थितांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या
शुभेच्छा दिल्या.
गुरुवारी सायंकाळी मूकबधिर विद्यालय कारेगाव व अनाथ मुलांचा आश्रम मोहरी येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित लावली यावेळी महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे अध्यक्ष डाळिंबकर व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी तसेच विष्णुपंत ढाकणे उद्योग समूहाचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी माजी सभापती गोकुळ दौंड,किसन आव्हाड,अर्जुन धायतडक,माणिक खेडकर,बाबुराव खेडकर,फुले सर,बाळासाहेब घुले,आकाश वारे,संदीप पालवे,रामदास सोनवणे,सुरेश हुलसुते,सागर गायकवाड,महादेव जायभाय यांच्यासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते.पक्षाचे तालुका प्रमुख विष्णुपंत ढाकणे यांनी आभार मानले.
0 Comments