पाथर्डी - विशिष्ट चांडाळ चौकडीच्या जाळ्यात गुरफटून पाथर्डी तालुक्याची आमदारकी चालवली जाते,त्याचा त्रास
संपूर्ण मतदारसंघाला भोगाव लागत असून आम्ही कामांचा हिशोब मागतो तो दिला जात नाही. एकदा हिशोब द्या
आम्हाला पटला तर मी जाहीर माफी मागायला तयार आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे
प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांना खेर्डे येथील संवाद यात्रे दरम्यान बोलतांना दिले.
संवाद यात्रेच्या निमित्ताने काल सायंकाळी ते खेर्डे येथे आयोजित
सभेत प्रताप ढाकणे हे बोलत होते. यावेळी शिवशंकर राजळे बंडू पाटील
बोरुडे महारुद्र कीर्तने नासिर शेख भगवान दराडे गहिनीनाथ शिरसाठ हुमायून आता योगेश
रासने वैभव सविता भापकर चंद्रकांत भापकर दहिफळे अंबादास राऊत सुनील राजळे
बाबासाहेब सांगळे दिगंबर गाडे सिताराम बोरुडे आदी पंचक्रोशीतील माणसे उपस्थित
होते.
ढाकणे म्हणाले की, तीन वेळा तुमच्या घरात आमदारकी होती विकासाचे
एक तरी ठोस काम दाखवा असे आम्ही वारंवार विनंती करतोय समोर या लोकांपुढे या केलेले
काम दाखवा आमचा हिशोब आम्ही देतोय तुम्हाला द्यायला काय हरकत आहे शेवगाव असो वा
पाथर्डी तालुका या दोन्ही तालुक्यांमध्ये विकासाचे नेमके ठोस काम आपण काय केले ते
तर आम्ही मागतोय मग ते लोकांना सांगायला तुम्हाला अडचण काय आहे.
पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांची अवस्था शेवगाव पेक्षा वेगळी नाही मग निधी
आणताय तर मग जातोय कुठे बाराशे कोटींचा हिशोब आम्ही केव्हा मागितला जेव्हा तुम्ही
बाराशे कोटी मतदारसंघात खर्च केले असा दावा केला आकडेवारीचे थोतांड थांबवा
मतदारसंघातली परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पहा महिने भरापासून आम्ही फिरतोय लोक
आमच्याकडे त्यांच्या व्यथा मांडतायेत मग लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही साडेआठ
वर्षापासून नेमके काम काय केले हे माझे वैयक्तिक मत नाही हा लोकांचा प्रश्न आहे.
मते घेण्यासाठी तर निवडणुकीला भावनिक बनवायचं सत्य यायचं कार्यभाग साधला की
ठराविक मंडळी तुमची सत्ता चालू होतात त्यातून तुम्हाला टक्केवारी मिळते जनता गेली
वाऱ्यावर अशी भावना ठेवून लोक कारभार लोकशाही चालत नाही येणारा काळ तुम्हाला माफ
करणार नाही रस्ते वीज पाणी असे अनेक गंभीर प्रश्न आज जनतेला सतवतात तुमच्या कासार
पिंपळगाव ची डीपी सुद्धा मला मंजूर करावी लागली यातच तुमच्या कामाचे गमक माझ्या
लक्षात आले उसाच्या प्रश्ना संदर्भात कासार पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील परिषद
गटातील अनेक गंभीर तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचलेला आहेत तुझा भाव करून व
आडनावे पाहून तुम्ही ऊस तोडीला प्राधान्य देता या गोष्टीला अर्थ नाही राजकारण
निवडणुकांपुरती असावे त्यानंतर तुम्ही संपूर्ण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतात हे
लक्षात घ्या.
माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता राजळे म्हणाल्या २०१९ च्या निवडणुकीला लोकप्रतिनिधींसाठी मी
वैयक्तिक वीस सभा घेतल्या विजयी झाल्यानंतर त्यांनी आभार दौऱ्यात सुद्धा मला
सहभागी करून घेतले नाही जे घरच्यांचे झाले नाहीत ते लोकांचे कधी होणार असा काय
गुन्हा आम्ही केला आमच्यावर पुन्हा ठपका ठेवता की आमच्या राजकीय महत्त्वाकांक्षा
वाढल्यात निश्चितपणे वाढू शकतात केव्हा ज्यावेळेस आम्ही रात्रंदिवस तुमच्या सत्तेसाठी
झगडलो तेव्हा मतदार संघातल्या कोणत्या विषयाला तुम्ही हात घातलात ते एकदा स्पष्ट
पणाने सांगा आमच्यावर सातत्याने अन्याय करतात बदनामी करून आमची प्रतिमा खराब
करण्याचा प्रयत्न करता याद राखा आम्ही जर खरे बोलायला प्रयत्न केला तर तुम्हाला या
गटात सुद्धा फिरता येणार नाही. याप्रसंगी राजेंद्र कराळे संदीप राजळे
मल्हारी टकले गोरक्ष बेळगे श्री लाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करून
आभार बाबासाहेब सांगळे यांनी मानले
0 Comments