शेवगाव – येथील गंगामाई साखर कारखान्यात इथेनॉल टाक्यांच्या भीषण स्फोटा मुळे कारखाना यंत्र सामुग्री भीषण आगीच्या भक्ष स्थानी पडली असून आगीत मोठमोठे स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत.
सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गंगा माई
साखर कारखाना प्रा.लि.परिसरातील इथेनॉल टाक्यांना अचानक आग लागून स्फोट होण्यास
सुरवात झाली त्यामुळे एकच गोंधळ उडाला असून कामगारांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ
सुरु केली आगीची तीव्रता मोठी असल्याने शेवगाव,भेंडा,पाथर्डी व पैठण येथून
अग्निशामक गाड्या व् रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या असून परिसरात धुरांचे लोट
पसरल्याने व आगीत वारंवार स्फोट होत आल्याने आग विझवण्यात अडथळा येत आहे.आगी मुळे
घटना ठिकाणी पोहचता येत नसल्याने जीवितहानी किवा वित्तहानी बाबत निश्चित माहिती अद्यापी
समजलेली नाही मात्र आगीमुळे परिसरात हाहाकार उडाला आहे. तसेच शेतकर्यांना संकटात
मदत करणारा कारखाना जळताना पाहून परिसरातील शेतकरी व् नागरीकातून हळहळ व्यक्त होत
आहे.
0 Comments