श्रेयवादासाठी नाही तर शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आग्रह - आ.तनपुरे


मिरी - वांबोरी चारीच्या विज बिलाचा प्रश्न आता आमच्या कार्यकर्त्यांनी सोडविला असल्याने वांबोरी चारीला लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे. सत्तेचा फायदा विरोधक घेत असुन आमची लढाई श्रेय घेण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. 

पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना वांबोरी चारीचे पाणी मिळावे म्हणुन आपण प्रयत्न करीत होतो, वांबोरी चारीचे विज थकल्यामुळे या योजनेचा विज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. आघाडीचे सरकार असताना आपण या योजनेच्या विज बिलाची अडचण येवु दिली नव्हती. आता या योजनेच्या थकीत बिलापोटी १ लाख ५० हजार रुपये भरले असल्याने या योजनेचा विज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे सांगुन आमदार तनपुरे म्हणाले, या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने टेल टु हेड पाणी देण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावु, सत्तेचा दुरुपयोग करुन श्रेय घेण्याचा आमचा प्रयत्न नाही तर या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे हा आमचा हेतु आहे. वांबोरी चारी सुरु होऊ नये म्हणुन अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव होता? हे या भागातील लोकांना सांगायची गरज नसल्याचेही आ. तनपुरे यांनी सांगितले. 

वांबोरी चारीच्या थकीत विज बिल भरण्यासाठी लाभार्थी गावामधुन फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिड लाख रुपये जमा करुन योजनेच्या थकीत विज बिलापोटी भरले. त्याच्या पावण्याची पुरावाच त्यांनी यावेळी दिला. माजी लोकप्रतिनीधी सरकार बदलल्याने खडबडुन जागे झाले आहेत. त्यांनी श्रेयवादासाठी आडकाठी आणली नाही तर येत्या दोन दिवसात आवर्तन सुरु होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

 


Post a Comment

0 Comments