पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पाठपुरावा करुन योजनेस मंजुरी मिळविली, या योजनेत पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, केशव शिंगवे, रुपेवाडी, सातवड, आडगाव, शिरापुर, जवखेडे खालसा, करडवाडी, कासार पिंपळगाव, पारेवाडी, कासारवाडी, कोल्हार, लोहसर, भोसे, करंजी, राघुहिवरे, मोहोळ बु. मोहोज खु., रेणुकावाडी, वैजुबाभुळगाव, डोंगरवाडी, धारवाडी, कडगाव, दगडवाडी, मांडवे, निबोंडी, शिराळ, चिचोंडी, त्रिभुवनवाडी, पवळवाडी, कौडगाव, देवराई, घाटसिरस, डमाळवाडी, खांडगाव, जोहारवाडी आदि गावांचा समावेश आहे. या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र पाईप लाईनची खोली नियमाप्रमाणे नसल्याने या भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तक्रार प्रकाशित होताच संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची पहाणी करुन संबंधित ठेकेदारांना सुचना दिल्या. ३१२ किलोमिटर लांबीच्या या योजनेचे तोपर्यंत रात्रंदिवस काम करुन ६० किलोमीटरचे निकृष्ट काम झाले होते. निकृष्ट झालेल्या पाईप लाईनचे काम पुन्हा उकरुन पुर्ण करण्याची मागणी या योजनेतील अनेक गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडुन होत आहे.
0 Comments