पाथर्डी - शहरातील शाळा कॉलेज मधील विद्यार्थिनीची छेडछाड थांबवण्यासाठी प्रतिबंधक व खबरदारीची उपाययोजना म्हणून श्री तिलोक जैन विद्यालयातील विद्यार्थिनींच्या भेटी घेवून समाज विघातक तत्वाकडून होणारया त्रासाची माहिती जाणून घेत यावर पोलिसांकडून केली जाणारी मदत व उपाययोजना याबाबत पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्यासह पोलीस सहकार्यांनी विद्यार्थिनीशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणीवर व विद्यार्थिनीची छेड काढणारे तसेच मुलांना गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती अथवा टोळी कडून होणारा
त्रासाबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालय व बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक
सुहास चव्हाण,
पोलीस
उपनिरीक्षक श्रीकांत डांगे,
पोलीस
कॉन्स्टेबल भगवान सानप
यांनी
विद्यार्थिनींच्या ग्रुपला स्वतंत्रपणे संवाद साधत तुमच्या बरोबर पोलीस बांधव कायम
आहे. कोणालाही घाबरण्याची गरज नसून केव्हाही तुम्ही पोलिसांची मदत मागा तुम्हाला
ती मदत केली जाईल.आमचा पोलीस स्टेशनचा व आमचा वैयक्तिक मोबाईल नंबर तुमच्याकडे
ठेवा. तुम्हाला जेव्हा जेव्हा त्रास होईल तेव्हा तेव्हा आम्हाला संपर्क साधत चला असे विद्यार्थीनीना सांगितले.
यावेळी प्राचार्य अशोक दौंड,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलिस कॉन्स्टेबल भगवान सानप, पर्यवेक्षक दिलावर फकीर, सुधाकर सातपुते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील कटारिया यांनी करून आभार
अशोक दौंड यांनी मानले.
0 Comments