वेदी प्रतिष्ठा, सुपार्श्वनाथ भगवान कलशारोहण,मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव


पाथर्डी - सुपार्श्वनाथ भगवान यांची शिकवण आचरणात आणत दिगंबर जैन समाज बांधवांनी धर्म संस्काराची चांगली जपणूक केली आहे. धार्मिक स्थळांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाचे सकारात्मक धोरण असून जैन मंदिराच्या कामासाठी वाढीव निधी मिळवण्याचा प्रयत्न करू अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

दिगंबर जैन मंदिराच्या सभागृहासाठी माजी नगरसेवक रामनाथ बंग दिपाली बंग व अनिल गुगळे यांच्या पुढाकाराने आमदारांनी स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये मंजूर केले.त्यामध्ये लोकवर्गणीची भर पडून सुमारे ३५ लाख रुपये किमतीचे सभागृह व मंदिर नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले. कलशारोहण सोहळा आज विविध मान्यवर व साधकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,नंदकुमार शेळके.अनिल बोरुडे,अजय भंडारी,अनिल गुगळे,राजेंद्र मुथा,माजी प्राचार्य सुभाष खाबिया यासह दिगंबर जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे,सचिव महावीर घोडके जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमाने आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या  'पाथर्डी तालुक्याला धार्मिक स्थळ व परंपरेचा मोठा वारसा असून धार्मिक आचरणाने समाजाच्या जडणघडणीत चांगले बदल घडून सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीत अशा साधकांचे योगदान लाभते,तालुक्यातील सर्वच धर्म स्थळांच्या बाबतीत लोकप्रतिनिधी या नात्याने सकारात्मक भूमिका ठेवून वाटचाल करू असे राजळे म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामनाथ बंग तर सूत्रसंचालन करून विवेक सातपुते यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी दयानंद अन्नदाते महावीर कांबळे सुनील लांब दादे , अशोक लांब दाढे विजय घोडके प्रदीप अन्नदाते आदींसह सर्व बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments