पाथर्डी – राष्ट्रीय
महामार्गावरील माळीबाभूळगाव हद्दीत अपेक्स लॉजवर पाथर्डी पोलिसांनी टाकलेल्या
धाडीत दोन अल्पवयीन मुलींसोबत असलेले दोन आरोपी व लॉजच्या मालकाला पोलिसांनी
ताब्यात घेतले असून बाल कल्याण समितीच्या मध्यस्थीने अल्पवयीन मुलीना पालकांच्या
ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु असून अल्पवयीन मुलींच्या पालकांनी आरोपी विरुद्ध फिर्याद
नोंदवण्यास नाखुशी दर्शवल्याने लॉज मालका सह दोघा आरोपी विरुद्ध उशिरा पर्यंत
प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु होती.
गोपनीय खबर मिळाल्या वरून सोमवारी दुपारी
४ वाजता माळी बाभूळगाव शिवारातील अपेक्स लॉजवर पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सचिन लिमकर,श्रीकांत डांगे,पो.कॉ.ज्ञानेश्वर
रसाळ, संदीप कानडे,दत्तात्रय बद्धे,कृष्णा बडे,किरण बडे यांच्या पथकाने घातलेल्या
धाडीत मालीबाभूळगाव येथील दोन आरोपी प्रदीप कोलते,अजय भोसले हे दोन शाळकरी
अल्पवयीन मुली सह अपेक्स लॉजच्या खोलीत आढळून आले त्यावेळी आरोपी अजय भोसले हा
तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला त्यामुळे पोलिसांनी सदरील एक आरोपी सह लॉजचा चालक
/ मालक बाळासाहेब भोईटे सर्व रा.माळी बाभूळगाव यांना ताब्यात घेतले असून अल्पवयीन
मुलींच्या पालकांनी उशिरा पर्यंत फिर्याद न दिल्याने पोलिसांची सदरील आरोपी
विरुद्ध उशिरा पर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु होती. या
घटनेतील उल्लेखनीय बाब म्हणजे शहरातील शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुली शाळेच्या
युनिफोर्म व दप्तरासह याठिकाणी आढळून आल्या यामुळे पालक व शिक्षकांनी या कडे विशेष
लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाथर्डी शहरासह तालुक्यातील राष्ट्रीय
महामार्गाच्या कडेला असलेल्या लॉज मधून खुलेआम शरीर शय्या करण्यासाठी खोल्या
पुरवल्या जात असून नियमबाह्य रीतीने अल्पावधीत बक्कल पैसा कमावण्याचा धंदा लॉज चालक
मालक करत आहेत.लॉज वरील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण
यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिसांनी मोहीम उघडली असून अश्या लॉजवर धाड
घालुन दप्तर तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहे याशिवाय धाडीत
सापडलेल्या जोडप्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी अल्पवयीन मुली व आरोपींना चौकशी
साठी पोलीस ठाण्यात आणले असता पंचायत समिती मधील एका माजी पदाधिकारी व दुसऱ्या पंचायत
समिती पदाधिकाऱ्याच्या मुलांने कार्यकर्त्यांचा जमावडा घेवून आरोपींना सोडून
देण्यासाठी पोलिसाशी हुज्जत घातली मात्र पोलिसांनी पुढारी पुत्राला रुद्रावतार
दाखवताच पुढारी पुत्राने तेथून काढता पाय घेतला.
0 Comments