पाथर्डी - मढी येथील गर्भगिरी डोंगरात असलेला नाथकालीन सूर्यकुंडाची (झरा ) वन विभाग
मढी यांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. सूर्यकुंडातील प्लास्टिक बाटल्या,प्लास्टीक पिशव्या, कचरा व गाळ काढून सूर्यकुंडाची साफ सफाई
करण्यात येवून सूर्यकुंड पुनर्जीवित करण्यात आले या श्रमदान मोहिमेत मढी येथील वन
कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
चैतन्य कानिफनाथ,चैतंन्य मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथांनी गर्भगिरी डोंगरात साधना केली या
डोंगरात धनदऱ्यात नाथ कालीन सुर्यकुंड आहे. सुमारे
पाच फूट खोल तीन फूट रुंदीचे खळगे पाण्याने भरलेले
असते,शेंडगेवाडी, मढी करडवाडी शिवारातील डोंगरदऱ्यात चरणारी जनावरे येथे पाणी पितात. यात्रेकरू
अधून-मधून येथील पाण्याने स्नान करून शिवपूजन करतात .मढी
मायंबा वृद्धेश्र्वर असा परिसर नाथपंथांची जन्मभुमी म्हणून ओळखला जातो.
या डोंगर दऱ्यामध्ये अनेक गुहा,निर्जनस्थळे आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या
गर्भगिरी डोंगर परिसरात अनेक जिवंत पाण्याचे झरे आहेत . सूर्यकुंडासह गर्भगिरी
डोंगर परिसरातील झरे स्वच्छ करण्याचा निर्धार तिसगाव
वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मढी
येथील वन कर्मचाऱ्यांनी हाती घेतला असून शनिवारपासून
स्वच्छता मोहीम राबवली.
या स्वच्छता मोहिमेत माजी सरपंच बाबासाहेब मरकड ,वनरक्षक संदीप कराळे ,वनकर्मचारी विष्णू मरकड,अशोक कुसारे,गणेश पाखरे,समीर मोमीन, हरी
भवार, वनपाल गाढवे,आदी उपस्थित
होते. कितीही मोठा दुष्काळ असला तरी यातील जलस्रोत आटत नाही अशी येथील ख्याती
आहे. कडक उन्हाळ्यातही या परिसरात सूर्यकुंडला भरभरून पाणी असते. टंचाई
काळात जनावरासह जंगली प्राणिमात्रांची तहान सूर्यकुंडावर
भागवली जाते.
मढी मायंबा वृद्धेश्र्वर असा परिसर नाथपंथांची जन्मभुमी म्हणून
ओळखला जातो. या डोंगर दऱ्यामध्ये अनेक गुहा,निर्जनस्थळे आहेत. गर्भगिरी
डोंगरात वन विभागाने मुक्या प्राण्यांची तहान
भागविण्यासाठी पाणवठे तयार केले आहेत. मात्र कडक उन्हाळ्यात पाण्याची टंचाई
निर्माण होते. त्या वेळी जिंवत पाण्याचे झरे वन्य
जिवांचे तहान भागवतात. सूर्यकुंडा सारखे अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांचे संवर्धन
मढीतील वन कर्मचारी श्रमदानातून काम करत असल्याचे दादासाहेब वाघुलकर वनपरिक्षेत्र
अधिकारी तिसगाव यांनी सांगितले.
0 Comments