
करंजी -परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असुन
चोरट्यांनी आता आपला मोर्चा या भागातील शेतकर्याकडे वळविला असुन शेतकर्यांच्या
विद्युत मोटारी तसेच सौर उर्जेच्या प्लेटा चोरीस जाण्याच्या घटना सतत घडत असुन
मोटारी व सौर उर्जेच्या प्लेटा चोरणारी टोळी या भागात सक्रिय झाली आहे.
पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील खांडगाव, जोहारवाडी, मांडवे, राघुहिवरे परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. चोरट्यांनी
आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळविला असुन या भागातील विहीरीवरील मोटारी, स्टार्टर तसेच सौर उर्जेच्या प्लेटा चोरीस जात आहेत. तालुक्यातील
मांडवे गावात १०-१२ विहिरीवरील मोटारी चोरीस गेल्या आहेत यासंबंधी काही
शेतकऱ्यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दिल्या आहेत. जोहारवाडी येथील
विविध कार्यकारी सोसायटीने चेअरमन मच्छिंद्र सावंत यांच्या शेतातील त्यांच्या
पत्नी खांडगाव-जोहारवाडीच्या उपसरपंच सौ. कविता सावंत यांच्या नावे असलेल्या ४०
हजार रुपये किंमतीच्या सौर उर्जेच्या प्लेटा गट नं. ६२ मधुन चोरीस गेल्या असुन
त्यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
परिसरातील खांडगाव,
जोहारवाडी, राघुहिवरे, मांडवा गावातुन यापुर्वी अनेक
मोटारी तसेच सौर उर्जेच्या प्लेटा चोरीस जाण्याचे प्रकार घडले आहेत मात्र
पोलिसांचा ससेमिरा नको म्हणुन शेतकरी पोलिसात तक्रार दाखल करीत नाहीत. या परिसरात
विहीरीवरील मोटारी व सौर उर्जेच्या प्लेटा चोरणारी टोळी कार्यरत असल्याने या
भागातील शेतकऱ्यांत भितीने वातावरण निर्माण झाले आहे. या टोळीचा बंदोबस्त लवकर न
झाल्यास या भागातील शेतकरी आता रस्त्यावर उतरतील असा इशारा मच्छिंद्र सावंत, लालासाहेब सावंत,
बंडु सावंत, सुदाम सावंत, दादासाहेब सावंत, दामोदर सावंत, सिताराम सावंत, अण्णासाहेब वांढेकर,
नानासाहेब वांढेकर, शशिकांत सावंत, संतोष चव्हाण, प्रकाश जगदाळे, पिनु ससे, महादेव चव्हाण सह परिसरातील अनेक शेतकर्यांनी दिला आहे.
सध्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा चालु आहेत, पोलिस कर्मचारी बंदोबस्तात गुंतले आहेत, तरीही लवकरच रात्रीची गस्त वाढवुन शेतकऱ्यांच्या मोटारी व सौर
उर्जाच्या प्लेटा चोरणाऱ्या चोरांना गजाआड करु असे पाथर्डी पोलीस निरीक्षक सुहास
चव्हाण यांनी सांगितले.तर करंजी परिसरातील जोहारवाडी, खांडगाव, मांडवेसह अनेक गावातील
शेतकऱ्यांच्या मोटारी तसेच सौर उर्जेच्या प्लेटा चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त न
झाल्यास या भागातील शेतकरी रस्त्यावर उतरतील असे मच्छिंद्र सावंत चेअरमन जोहारवाडी
सोसायटी यांनी सांगितले.
0 Comments