पाथर्डी - श्री क्षेत्र मढी
येथे यात्रेनिमित्त कानिफनांथांच्या संजवणी समाधीला पारंपारीक पद्तीने तेल
लावण्यात आले. अंखड मंत्रोपचारात नगरा,शंख्य ध्यवनीच्या
निनादात तेल लावण्याचा सोहळा उत्साहपूर्ण व भत्तीमय वातवरणात संपन्न झाला.नांथाच्या
जयजयकारात झालेल्या विधीमुळे गडावर वातावरण भक्तिमय झाले होते.यावेळी भावीक,विश्र्वस्त
ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्तीत होते.
मढी यात्राउत्सवा
निमीत्त शुक्रवारी सायकाळी ४ वाजता प्रथमता देवस्थान समीतीचे पदधिकारी व ग्रामस्त
यांनी कानिफनाथांच्या चांदीच्या पादुकाची पुजा करुण तेल लावण्याच्या विधीस सुरवात
केली. या वेळी मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, उपाअध्यक्ष सचीन गवारे, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड,
विश्वस्त अर्जुन शिरसाठ,रवींद्र आरोळे, श्यामराव मरकड,डॉ.विलास मढीकर, ग्रामस्थ, लक्ष्मण मरकड, भाग्येश मरकड, माजी सरपंच
बाबासाहेब मरकड, देवीदास मरकड,
नानाभऊ मरकड, किशोर मरकड, नवनाथ मरकड,बाबासाहेब मरकड आदी ग्रामस्त उपस्थीत होते.
शुद्ध पंचमीला
नांथाच्या समाधीला तेल लावण्याचा विधी असतो.कुभारांकडुन मातीचे कोळंबे व पाच घट
आणले जातात त्यास नाडाबांधवुन त्यामध्ये तेल टाकले जाते. गुलाबपाणी दुध,गंगाजल, हळद,चंदण पावडर,बुक्का भस्म असे
पदार्थ कालवुन नांथांच्या संजवणी समाधीला तेल लावण्याचा पांरपारीक विधी केला जातो. तेल लावण्याची शेकडो वर्षाची परंपरा असुन प्रत्येक देवतांच्या उत्सवापुर्वी शुभ व धार्मीक कार्याचा प्रारंभ तेल लावण्यापासुन
होतो. ग्रामस्थ तेल लावण्यापासुन करतात समाधीसह उत्सव मुर्तीना थंडावा राहुन सुगंधी द्रवाने
तैलाभ्यंग होऊन केली जाणारी पुजा यात्रे विषयची लगबग वाढवणारी ठरते. तेल लावल्यानंतर आजपासुन गुढीपाडव्या पर्यंत मढी ग्रामस्त व्रतस्थ
असतात.
देवाला तेल
लावल्यानंतर मढी ग्रामस्त आजपासुन घरात गोड धोड नाही विवाह कार्यत जाने नाही
शेतीची कामे बंद दाढी कटींग,नवीन वस्त्र परिधान येवढेच नाहीतर
स्वतःच्या घरात मंगल कार्य करत नाहीत हा संपुर्ण यात्रा कालावधी भावीक व यात्रेकरूंच्या
सेवेसाठी राखीव ठेवला जातो अन्य ठिकाणी यात्रा काळात देवाला तेल लावले जाते मढी
येथे मात्र देवाला तेल लावल्यानंतर ग्रामस्थ व्रतस्थ राहतात .पूर्वीपार चालत आलेली
परंपरा असून त्यानुसार आज हा विधी पार पडला. यात्रेसाठी कानिफनांथाच्या उत्सवाचि तयारी करता याव्या व मंदीराचे
नियोजन सोयी सुवीधा बाबत पुरेसा वेळ मिळावा म्हणुन मढी ग्रामस्त या गोष्टी करत
नाही.
0 Comments