पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावे एक वर्षात टँकरमुक्त होणार ! जलजिवन योजनेचे काम वेगात,नागरिकात समाधान !

करंजी - पाथर्डी तालुक्यातील कायम दुष्काळग्रस्त गावांची तहान आता भागणार असुन जलजिवन योजनेंतर्गत पश्चिम भागातील ३६ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या या योजनेचे काम वेगाने सुरु असल्याने या भागातील वाड्या-वस्त्यावरील लोकांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. 

पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भाग हा कायमचा दुष्काळी भाग म्हणुन ओळखला जातो. पावसाळा कसाही झाला तरी ऐन उन्हाळ्यात या भागात पिण्याच्या पाण्याचे टँकरची गरज पडते. पाथर्डी तालुक्यातील या भागातील ३९ गावे राहुरी मतदार संघाला जोडलेली आहेत. या भागाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणुन जलजिवन योजनेंतर्गत पाणी योजनेत या गावांचा समावेश करुन १५५ कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी पाठपुरावा करुन मंजुर करुन आणला.

मुळा धरणापासुन लोखंडी पाईपच्या सहाय्याने वांजोळी येथील जलकुंभात हे पाणी सोडण्यात येणार असुन लोखंडी पाईपच्या सहाय्याने गावातील नव्याने बांधण्यात येणाऱ्या जलकुंभातुन वाड्या-वस्त्यावर हे पाणी सोडण्यात येणार आहे. १२५ किलोमिटर लांबीची ही लोखंडी पाईप लाईन आहे. या भागातील २८ गावात नविन जलकुंभाची उभारणी करण्यात येणार आहे तर ३९ गावातील जुन्या टाक्या वापरण्यात येणार आहेत. 

या जलजिवन पाणी योजनेचे काम अतिशय वेगाने चालु असुन गावा-गावात व वाड्या वस्तीवरील पाईपलाईनचे काम ७० टक्के काम होत आले असुन मेनलाईनचे (लोखंडी पाईप) टाकण्याचे काम युध्द पातळीवर चालु असल्याने हा भाग लवकरच टँकरमुक्त होणार असल्याने या भागातील लोकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जलजिवन योजनेंतर्गत या भागात चालु असलेल्या योजनेमुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचे संकट लवकरच दुर होवुन या भागातील गावे टँकरमुक्त दिसतील. आणि या गावातील नागरिकांची दुष्काळाच्या तावडीतुन सुटका होईल असे ॲड.संदिप अकोलकर यांनी सांगितले तसेच  या योजनेचा कालावधी दिड वर्षाचा असला तरी या योजनेचे काम आपण २०२३ डिसेंबर अखेर पुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असुन पुढील तिन महिन्याच्या कालावधीमध्ये या योजनेची ट्रायल घ्यायची असल्याने या योजनेचे काम रात्रंदिवस करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे रमेश आंबेडकर (उपअभियंता जिवन प्राधिकरण) यांनी सांगितले. 

 

Post a Comment

0 Comments