पाथर्डीत डिझेल अभावी बससेवा ठप्प,प्रवाशी संतप्त !


पाथर्डी - येथील राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस.टी.च्या गैरकारभाराचे नमुने दैनदिन समोर येत असून त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत असून एसटीच्या अनागोंदी कारभारामुळे डीजेल अभावी प्रवासी वाहतूक ठप्प झाली असून प्रवासी पर्यायी वाहनांचा वापर करत असल्याने एसटी कायमस्वरूपी आपल्या प्रवासी वर्गाला मुकत असल्याची चित्र निर्माण झाले असून याबाबत वरिष्ठ स्तरावर हस्तक्षेप करून योग्य कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पाथर्डी एस.टी एकेकाळी मोठ्या प्रमाणावर प्रवासी वर्ग राज्यभर प्रवास करून एसटीला मोठे उत्पन्न मिळून देत होता. पाथर्डी तालुक्यात अनेक देवस्थान असल्याने या ठिकाणी तसेच ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसने दळणवळण सुरू होते परंतु गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एस.टी.च्या अनेक चुकीच्या धोरणामुळे अनागोंदी कारभारामुळे ग्रामीण भागातील राज्यभरात पसरलेले दळणवळणाची एसटीचे जाळे मोडीत निघाले असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

राज्यभरातील प्रमुख देवस्थानाच्या ठिकाणी येथील प्रवासी वाहतूक एसटीच्या चुकीच्या धोरणामुळे बंद झाली आहे, तुळजापूर बस, प्रवासी कमी असल्याचे कारण देत बंद करण्यात आली असून यामागील खरे कारण मात्र वेगळेच आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून जुन्या बस स्थानकाचे नूतनीकरणाचे काम रखडले असून हे काम म्हणजे असून अडचण नसून कोळंबा असे विदारक चित्र निर्माण झाले आहे.

जुन्या बस स्थानकात अनेक अवैध धंद्यांनी बस्तान बसवली असून या ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत याशिवाय हे बस स्थानक म्हणजे कचरा डेपो आहे का ? असा प्रश्न सामान्य प्रवासी विचारत आहेत. नवीन बस स्थानकात संध्याकाळी आठ वाजता सर्व बस डेपोमध्ये लावल्या जातात या ठिकाणी काळोखाचे साम्राज्य पाहायला मिळते याशिवाय या ठिकाणी डेपो मॅनेजर यांचा नसल्याने परिसरात मद्यपी लोकांचा गोतावळा पाहायला मिळतो. याशिवाय जुने नवीन बस स्थानकात खिसे कापू,साखळी चोर यांचा सुळसुळाट झाला असून बस डेपो सोईस्कर रित्या याकडे दुर्लक्ष करून ही जबाबदारी पोलीस प्रशासनावर ढकलत आहे. शिवाय डेपो मॅनेजर यांचे प्रशासनावर पकड नसल्याने कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर हे देखील वैतागले असून त्यांच्याकडे या गैरकारभाराविषयी हळहळ करण्यापलीकडे काहीही शिल्लक नाही. स्थानिक डेपो मॅनेजर नसल्याने कधीही डिझेल संपले या कारणाने एसटी उभ्या आहेत. एकंदर प्रवासी पर्यायी पर्याय शोधत असून कायमस्वरूपी येथील एसटी बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत डेपो मॅनेजर हे घड्याळी तासानुसार कार्यालयात येतात जातात अशी माहिती समजली असून प्रवासी वर्गातून मोठ्या प्रमाणावर रोष त्यांच्या या कारभाराबाबत व्यक्त केला जात आहे.

  

Post a Comment

0 Comments