श्री मोहटादेवी गडावर श्रीराम जन्मोत्सव व वासंतिक नवरात्र संपन्न


पाथर्डी - श्री मोहटादेवी मंदिरात वासंतिक नवरात्र महोस्तवाच्या सांगतेनिमित्त नवचंडी महायज्ञ संपन्न झाला। विश्वस्त ऍड कल्याण बडे, डॉ श्रीधर देशमुख व अक्षय गोसावी यांनी सपत्नीक होमहवन महापूजा केली। विश्वशांती व संपूर्ण भारतवासीयांचे आरोग्य, कल्याणार्थ महासंकल्प करून कुमारिकेंचे पूजन करण्यात आले. 

श्रीराम जन्मोत्सव वेळी श्रीरामाची भजने, पाळणा व आरती, रामनामाचा जयघोष करून महाप्रसाद वाटप करून साजरा करण्यात आला.पौराहित्य नारायणदेवा सुलाखे खोकरमोहकर, भूषणदेवा साकरे, भास्कर देशपांडे, विशाल पाटेगावकर, अभिषेक रामदासी व भगवान जोशी यांनी केले।यावेळी देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब दहिफळे, अनुराधा केदार तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे दिली.

Post a Comment

0 Comments